Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मनसेच्या माजी शहराध्यक्षांवर जीवघेणा हल्ला ; गंभीर जखमी

मनसेच्या माजी शहराध्यक्षांवर जीवघेणा हल्ला ; गंभीर जखमी

पालघर: मनसेचे नेते अविनाश जाधव यांचे निकटवर्तीय आणि पालघर मनसेचे माजी शहराध्यक्ष सुनील राऊत यांना पालघर येथील मनसे कार्यालयातच कथितरित्या जबर मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या हल्ल्यात राऊत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या पालघर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पक्षातील अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. घटनेनंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणामागील नेमके कारण काय, हल्लेखोर कोण आणि मारहाणीमागील कारणांचा तपास पोलीस करत आहेत. अद्याप याप्रकरणी अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. राजकीय पक्षाच्या कार्यालयातच एका माजी शहराध्यक्षावर झालेल्या या कथित हल्ल्यामुळे पालघरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता व्यक्त होत असून, पोलीस तपासानंतरच संपूर्ण घटनेचे वास्तव स्पष्ट होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar