Prepare time: 10 minCook: 15 minsReady in: 25-30 mins
Ingredients
- जाड पोहे - 2 कप
- मध्यम आकाराचे बटाटे - 2
- चिरलेला कांदा - 1
- हिरव्या मिरच्या - 2
- आलं लसूण पेस्ट - 1
- कोथिंबीर
- हळद - 1/2 चमचा
- लाल तिखट - 1 चमचा
- जिरे - 1/2 चमचा
- धणे जिरे पूड - 1 चमचा
- हिंग - चिमूटभर
- मीठ - चवीनुसार
- तांदळाचे पीठ - 2 ते 3 चमचे
Directions
- सर्वप्रथम पोहे स्वच्छ धुऊन 5 मिनिटे मऊ होण्यासाठी बाजूला ठेवा. त्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या.
- एका मोठ्या भांड्यात मऊ झालेले पोहे, उकडलेले बटाटे, कांदा, हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड, जिरे, हिंग आणि चवीनुसार मीठ घाला.
- मिश्रणात तांदळाचे पीठ घालून सर्व साहित्य एकजीव करून घट्ट मिश्रण तयार करा.
- कढईत तेल गरम करा.
- तेल चांगले तापल्यानंतर हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने मिश्रणाचे छोटे-छोटे भजी तेलात सोडा.
- मध्यम आचेवर भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत होईपर्यंत तळून घ्या.
- तयार भजी टिश्यू पेपरवर काढा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल.
- गरमागरम पोह्यांची भजी हिरवी चटणी किंवा वाफाळत्या चहासोबत सर्व्ह करा.

