मुंबई : "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशी आर्त हाक देत मुंबईकरांनी आपल्या पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पाला आज (18 सप्टेंबर) भावपूर्ण निरोप दिला. 14 सप्टेंबर रोजी प्रत्येक घारत आणि मंडळात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला आज भक्तांनी जड अंत:करणाने निरोप दिला.
त्यांचेच फोटो आपण पाहुया…
पाच दिवस घरात आणि मंडळात मुक्काम केल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देताना सर्वच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!" ही घोषणा देताना भक्त दिसून आले. विसर्जनापूर्वी गणपती बाप्पाची विधीनुसार उत्तरपूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला. पाच दिवसांचा पाहुणचार आटोपून लाडका बाप्पा आपल्या घरी निघाल्यावर भक्त भावूक झाले होते. आपल्या लाडक्या बाप्पाला कृत्रिम तलावात विसर्जित करण्यास भक्तांनी प्राधान्य दिले. विसर्जनाच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी केवळ जमिनीवरच नव्हे, तर हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर आणि गर्दीवर बारकाईने लक्ष ठेवले गेले
