Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईत अचानक पावसाचा धुडगूस; अंधेरी सबवेसह अनेक रस्ते पाण्याखाली

मुंबईत अचानक पावसाचा धुडगूस; अंधेरी सबवेसह अनेक रस्ते पाण्याखाली

मुंबई : एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या काळात पावसाचा मोठा खंड पडला असून जवळपास 45 दिवस पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरातील नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे.

मात्र आज (29 सप्टेंबर) संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे एकीकडे मुंबईकरांची तारांबळी उडाली, तर दुसरीकडे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना त्याच पाण्यातून घरापर्यंत वाट काढत जावे लागत आहे.

गोरेगावमधील आरे कॉलनीमध्ये आज संध्याकाळी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी 6 ते 8 या वेळेत आरे कॉलनीमध्ये 64 मिमी पाऊस पडला जुहूमध्ये 55.4 मिमी पावसाची नोंद झाली, तर अंधेरी पूर्व 50.2 मिमी आणि वर्सोवा 45.4 मिमी इतका पाऊस पडला. त्यामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. पूर्व उपनगरांतील पवई येथे 59.4 मिमी, तर धारावीमध्ये 14 मिमी पाऊस पडला. दोन तासांच्या कालावधीत शहरातील इतर भागांत 8.8 मिमी ते 10.8 मिमी दरम्यान पावसाची नोंद झाली आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar