नवरात्रीत चनिया चोली, घागरा किंवा कुर्त्यांसोबतच पारंपरिक साड्यांनाही विशेष पसंती दिली जाते. मात्र, नेहमीच्या साडीला थोडा मॉडर्न टच दिला तर तुमचा लूक अधिक हटके आणि स्टायलिश दिसू शकतो.
यासाठी महागडे कपडे खरेदी करण्याचीही गरज नाही. तुमच्या कपाटातील साड्यांचा वापर करून तुम्ही नवरात्रीसाठी खास लूक तयार करू शकता.
पारंपरिक साडी आणि ट्रेंडी ब्लाउज
साध्या सिल्क किंवा कॉटन साडीसोबत कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज, पफ स्लीव्हज, हाय नेक किंवा बोट नेक ब्लाउज ट्राय करू शकता. नवरात्रीसाठी मिरर वर्क किंवा एम्ब्रॉयडरी असलेला ब्लाउज निवडल्यास पारंपरिक साडीला ट्रेंडी लूक मिळेल.
बेल्टचा वापर
पारंपरिक साडीवर ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर बेल्ट किंवा नाजूक डिझाइनचा बेल्ट घातल्यास तुमचा लूक आकर्षक होईल.
ऑक्सिडाइज्ड दागिने
नवरात्रीत ऑक्सिडाइज्ड झुमके, मोठे नेकलेस, बांगड्या आणि चोकर यामुळे छान लूक मिळतो. मात्र, साडीवर आधीच भरलेली असेल तर जास्त दागिने घालू नयेत.
साडी ड्रेपिंग
नेहमीच्या पद्धतीने साडी नेसण्याऐवजी बेल्ट ड्रेपिंग, प्लीट्स व्यवस्थित ठेवून साडी ट्राय करावी.
फुटवेअर आणि हेअरस्टाइल
साडीच्या रंगाला शोभेल अशी मोजडी किंवा आरामदायी सँडल निवडावी. केसांचा अंबाडा, वेणी किंवा मोकळ्या केस अशी हेअरस्टाईल करता येईल.

