Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Navi mumbai : स्वातंत्र्यदिनी पालिकेच्या गुणवंत कर्मचार्‍यांचा गौरव

Navi mumbai : स्वातंत्र्यदिनी पालिकेच्या गुणवंत कर्मचार्‍यांचा गौरव

वी मुंबई : माझी वसुंधरा अभियानात राज्यात व्दितीय क्रमांकाचे पर्यावरणशील शहर आणि देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या सुपर स्वच्छ लीग या विशेष कॅटेगरीत नवी मुंबई शहराला मानांकनप्राप्त मिळाले आहे.

शहर स्वच्छतेसाठी योगदान देणार्‍या घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, उद्यान, पाणीपुरवठा व मलनि:स्सारण व्यवस्थापन विभागातील १२ गुणवंत कर्मचार्‍यांचा सन्मान स्वातंत्र्य दिनी करण्यात आला. ८० व्या स्वातंत्र्यदिनी पालिका मुख्यालयाच्या आवारात महापौर सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते आणि पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने 'हर घर तिरंगा' मोहीम वंदे मातरम् या गीतास समर्पित असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यालयामध्ये केंद्र सरकारच्या संस्कृति मंत्रालयाने प्रकाशित केलेले तिरंगा व वंदे मातरम् माहितीप्रद प्रदर्शन लावण्यात आले आहे. महापौर सुजाता पाटील, आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी प्रदर्शनाला भेट दिली. देशाचा प्रेरणादायी इतिहास जाणून घेण्यासाठी १७ ऑगस्टपर्यंत मुख्यालयातील तिरंगा व वंदे मातरम् प्रदर्शनाला नवी मुंबईकरांनी भेट देण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
प्रोजेक्ट मुंबई आणि माईंडस्पेस आरईआयटी यांच्या सहयोगातून पालिकेच्यावतीने राबविण्यात आलेल्या संकलित प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून त्यापासून बनविलेल्या १०० कचराकुंड्या व ६५ गार्डन बेंचेसचे वितरण करण्यात आले.

हेही वाचा…Sawan 2026 : कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ? पाहा संपूर्ण यादी

याप्रसंगी आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, महिला व बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार, नगरसेविका नेत्रा शिर्के, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारीवृंद तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस, अग्निशमन जवान व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक यांच्या पथकांची याप्रसंगी लक्षणीय उपस्थिती होती.

उंच ध्वज पाहण्यासाठी गर्दी :मुख्यालय इमारती समोरील २२५ फूट उंच व भव्यतम स्वरूपातील प्रतिकात्मक राष्ट्रध्वज पाहण्यासाठी नवी मुंबईकर तसेच शहराला भेट देणार्‍या नागरिकांनी गर्दी केली आहे. रात्री तिरंगी रंगात उजळून निघालेल्या मुख्यालयाला भेट देत यासोबत अत्यंत आवडीने सेल्फी व छायाचित्रे काढली.

कचराकुंड्या, गार्डन बेंचेसचे वितरण : प्रोजेक्ट मुंबई आणि माईंडस्पेस आरईआयटी यांच्या सहयोगातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या संकलित प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून त्यापासून बनविलेल्या १०० कचराकुंड्या व ६५ गार्डन बेंचेसचे मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.

तिरंगा व वंदे मातरम् माहिती प्रदर्शन :वंदे मातरम् या राष्ट्रीय गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने यावर्षीची हर घर तिरंगा मोहीम वंदे मातरम् या गीतास समर्पित असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यालयामध्ये केंद्र सरकारच्या संस्कृति मंत्रालयाने प्रकाशित केलेले तिरंगा व वंदे मातरम् माहिती प्रदर्शन लावण्यात आलेले आहे. महापौर सुजाता पाटील, आयुक्त डॉ.कैलास शिंदे व इतर मान्यवरांनी या प्रदर्शनाची पाहणी करीत नवी मुंबईकर नागरिकांनी आपला प्रेरणादायी इतिहास जाणून घेण्यासाठी १७ ऑगस्टपर्यंत मुख्यालयात ठेवण्यात येणा-या या तिरंगा व वंदे मातरम् प्रदर्शनाला आपल्या मुलांसह आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar