Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करताना या गोष्टी नक्की तपासा

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करताना या गोष्टी नक्की तपासा

ध्या ट्रेंडी आणि एलिगंट लुकसाठी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी (Oxidised Jewellery) महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. इंडो-वेस्टर्न असो वा पारंपारिक कपडे, ही ज्वेलरी कोणत्याही आउटफिटवर छान दिसते.

पण ती खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि ज्वेलरी दीर्घकाळ टिकेल. Oxidised Jewellery Shopping

क्वालिटी
ऑक्सिडाइज्ड दागिने खरेदी करताना ते कोणत्या धातूचे बनलेले आहे ते तपासून घ्यावे. त्याला गंज चढला असेल तर असे दागिने अजिबात विकत घेऊ नये.

वॉरंटी
ब्रँडेड दुकानातूनच ऑक्सिडाइज्ड दागिने खरेदी करावेत, कारण इथे तुम्हाला दागिन्यांची वॉरंटी किंवा गॅरंटी कार्ड मिळते. जर भविष्यात दागिन्यांमुळे तुमच्या त्वचेला काही नुकसान झाले तर तुम्ही याची तक्रार देखील करता येते.

Blouse Cups : नेक डिझाइननुसार निवडा योग्य ब्लाऊज कप्स

वजन
ऑक्सिडाइज्ड दागिने खरेदी करताना त्याच्या वजनाकडे जरूर लक्ष द्यावे, कारण स्वस्त आणि स्थानिक दागिने खूपच जड असतात.

रंग
ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचा रंग सहसा गडद राखाडी असतो. पण जास्त काळ हवेत ठेवल्यास त्याचा रंग काळा होऊ शकतो.

धारदार कडा
दागिन्यांची मागची बाजू किंवा कडा जास्त टोकदार किंवा खडबडीत नसाव्यात, नाहीतर ते घालताना त्वचा किंवा कपड्यांना अडकून नुकसान होऊ शकते.

नेल एक्सटेंशन काढताना घ्या ही काळजी, नाहीतर होईल नुकसान

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar