घराच्या भिंतीवर अचानक पाल दिसली की भीती आणि किळस वाटणे अगदी साहजिक आहे. पाल पळवण्यासाठी बाजारात अनेक रासायनिक स्प्रे मिळतात, पण ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. अशावेळी तुम्हाला काही झाडे मदत करू शकता.
काही विशिष्ट झाडे घरात ठेवून तुम्ही पालींना कायमचे दूर पळवू शकता. जाणून घेऊया अशाच नैसर्गिक आणि सुरक्षित झाडांबद्दल..
रोझमेरी या झाडाचा सुगंध तीव्र असतो. त्यामुळे या सुगंधाने पाली दूर राहू शकतात.पुदीन्याचा सुंगध तीव्र असतो. तुम्ही पुदीना कोणत्याही भांड्यात लावू शकता. यासह घराच्या आजबाजूचे वातावरण सुंगधित होते.किटक आणि डास यांना खाण्यासाठी पाली घरात येतात. मात्र घरात जर लेमनग्रास असेल तर किडे घरात येत नाहीत. ज्यामुळे पालीही फिरकत नाही.जांभळ्या रंगाची फुले असणारी लवेंडरचा सुगंधही तीव्र असतो. मात्र, या सुगंधाने किटक आणि पाली घरात येत नाहीत.तुळशीच्या सुंगधाने गॅलरीतील अनेक किटक लांब राहातात.जर पालींचा प्रादुर्भाव असेल तर घरात तुळस नक्की लावावी.झेंडूच्या फुलांचे झाड घरात लावल्यास पाली येणार नाहीत कारण या झाडाचा वास अतिशय तीव्र असतो.
