Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Panvel : पनवेल पालिकेत  'सेवा संकल्प' अभियानाचा शुभारंभ

Panvel : पनवेल पालिकेत 'सेवा संकल्प' अभियानाचा शुभारंभ

नवेल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले जीवन देशाप्रती समर्पित केले आहे. त्यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्यावतीने १७ ते १७ ऑक्टोबर या एक महिन्याच्या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान' राबविण्यात येणार आहे.

महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी मैदानावर या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी (ता.१७) करण्यात आला.

या प्रसंगी उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, प्रभाग समिती सभापती अजय बहिरा, नगरसेवक गणेश कडू, सुमित झुंजारराव, कुसूम म्हात्रे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त रविकिरण घोडके, मुख्य लेखा वित्तअधिकारी पुनम पाटील, लेखाधिकारी संग्राम ऱ्होरकटे, शहर अभियंता राजेश कर्डिले, सहाय्यक आयुक्त बाळाराम रातांबे, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख किर्ती महाजन, भा़डांर विभाग प्रमुख प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते.

हेही वाचा… हिंदी शिकवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, राज्य सरकारने आपली मानसिकता बदलावी - सर्वोच्च न्यायालय

यावेळी राष्ट्रीय प्रतीकांची मानवी रांगोळी साकारण्यात आली. तसेच अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत आज पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भारताच्या नकाशाची भव्य मानवी रांगोळी साकारून देशभक्तीचा संदेश दिला. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या उर्दू शाळा व दि.बा पाटील इंग्लीश मिडीयम शाळेच्या विद्यार्थ्यांनी 'सत्यमेव जयते, विकसित भारत २०४७' यावर आकर्षक मानवी रांगोळी साकारत विकसित भारताचे स्वप्न अधोरेखित केले.

या अभियानांतर्गत आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने 'सेवा माझे योगदान' या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये नाट्यगृहात मेळावा आयोजित करण्यात येणार असून दहा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यात आरोग्य तपासणी शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता, मतदार जागृती, महिला आरोग्य काळजी यांसह विविध सामाजिक विषयांवर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नागरिकांचा सहभाग वाढविणे, स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, स्वच्छता लक्षित युनिट परिवर्तन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सफाईमित्र सन्मान, युवक व विद्यार्थी सहभाग आणि कचऱ्यापासून संपत्ती निर्मिती यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा… प्रेमविवाह करणाऱ्या लेकीचे वडिलांनीच केले अपहरण, चित्रपटाप्रमाणे पोलिसांनी केली मुलीची सुटका

महानगरपालिकेच्या संबंधित विभागांच्या माध्यमातूनही 'सेवा, माझे योगदान' अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पर्यावरण विभागामार्फत वृक्षलागवड, घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत नागरी स्वच्छता उपक्रम, तर आरोग्य विभागामार्फत रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांचा त्यामध्ये समावेश असेल. अभियानाचा समारोप १६ ऑक्टोबर २०२६ रोजी 'सेवा ज्योत यात्रा' समारंभाने होणार आहे. या यात्रेत बाईक रॅलीचा समावेश असेल. त्यानंतर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा सन्मान व बक्षिसांचे वितरण करण्यात येणार असून, महापालिकेच्या सेवा प्रमाणपत्रांचेही वितरण केले जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar