पावसाळा सुरू झाला की जंगल, डोंगर आणि शेतांच्या परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवतात. या रानभाज्या चविष्ट तर असतातच, शिवाय अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतात. ग्रामीण भागात या भाज्यांना विशेष महत्त्व आहे.
मात्र रानभाज्या खाताना काळजी घ्यावी लागते. कारण चुकीची वनस्पती विषारी असू शकते. म्हणूनच रानभाज्यांची योग्य ओळख असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या भाज्या घेताना ओळखीच्या व्यक्तीकडूनच घ्याव्यात. रानभाज्या स्वच्छ पाण्यात अनेक वेळा धुवूनच वापराव्यात. तसेच चांगल्या प्रकारे शिजवून खाव्यात.
१. भारंगी
पचनासाठी उपयुक्त मानली जाते.
पारंपरिक आहारात विशेष स्थान.
२. टाकळा
लोह, कॅल्शियम आणि फायबरचा चांगला स्रोत.
भाजी, पातळ भाजी किंवा पिठल्यासोबत खाल्ली जाते.
३. कुर्डू
व्हिटॅमिन A आणि C ने समृद्ध कुर्डूची भाजी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. पावसाळ्याच्या दिवसात दमट वातावरणामुळे विषाणू वाढतात. त्यामुळे संसर्गाचा धोकाही वाढतो.
अशावेळी रोगप्रतिकारकशक्ती उत्तम असल्यास आजाराचा धोका कमी असतो.
४. अळूची पाने
अळूच्या पानापासून अळू वडी किंवा भाजी बनवतात. ही भाजी शिजवताना चिंच किंवा कोकम वापरल्यास खवखव कमी होते.
५. तेरडा
ग्रामीण भागात तेरडा ही लोकप्रिय रानभाजी आहे. तेरडा ही पौष्टिक आणि चविष्ट भाजी आहे.
६. फोडशी
फोडशी हलकी आणि पचायला सोपी भाजी असून पारंपरिक पद्धतीने ती बनवली जाते.
७. चाकवत
चाकवत मद्ये लोह, कॅल्शियम आणि फायबर मुबलक असते. भाजी, पराठे किंवा डाळीत चाकवत बनवतात.
८. माठ
माठ व्हिटॅमिन A, C आणि लोहाने समृद्ध भाजी आहे. नियमित आहारात समाविष्ट करण्यास योग्य.
९. शेवळा
शेवळा काही भागांत पावसाळ्यात मिळणारी पारंपरिक रानभाजी आहे. स्थानिक पाककृतींमध्ये शेवळा वापरली जाते.
१०. बांबूचे कोवळे कोंब
बांबूचे कोवळे कोंबपासून ही भाजी बनवली जाते. योग्य प्रक्रिया करून भाजी, लोणचे किंवा आमटीमध्ये वापरले जातात.

