Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फळं फ्रिजमध्ये ठेवावी की बाहेर? कोणतं फळ कुठे ठेवावं?

फळं फ्रिजमध्ये ठेवावी की बाहेर? कोणतं फळ कुठे ठेवावं?

बाजारातून ताजी फळं आणल्यानंतर ती थेट फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय अनेकांची असते. काही जण मात्र फळं बाहेरच ठेवतात. पण प्रत्येक फळाला स्टोअर करण्याची पद्धत सारखी नसते. काही फळं खोलीच्या तापमानावर चांगली पिकतात, तर काही कापल्यानंतर किंवा पिकल्यावर फ्रिजमध्ये अधिक योग्य ठरतं.

जाणून घेऊयात कोणतं फळ कुठे ठेवावं…

केळी
केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याच्या सालीचा रंग लवकर काळसर होऊ शकतो. त्यामुळे साधारणपणे केळी खोलीच्या तापमानावर ठेवणं योग्य.

सफरचंद
सफरचंद फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांचा ताजेपणा आणि कडकपणा अधिक काळ टिकू शकतो. मात्र ते इतर फळांपासून थोडं वेगळं ठेवणं चांगलं, कारण सफरचंदातून निघणारा नैसर्गिक वायू दुसरी फळं लवकर पिकवू शकतो

आंबा
कच्चा आंबा पिकण्यासाठी खोलीच्या तापमानावर ठेवा. आंबा पिकल्यावर त्याचा ताजेपणा टिकवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवता येतो. कापलेला आंबा मात्र झाकून फ्रिजमध्येच ठेवावा.

द्राक्षं / बेरीज
द्राक्षं, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी यांसारखी फळं खराब होण्यापासून वाचवण्यासाठी हवेशीर डब्यात किंवा पिशवीत घालून फ्रिजमध्ये ठेवणं अधिक योग्य.

संत्री / मोसंबी
ही फळं काही काळ खोलीच्या तापमानावर ठेवता येतात. जास्त दिवस साठवायची असल्यास फ्रिजमध्ये ठेवल्यास ताजेपणा अधिक काळ टिकू शकतो.

कलिंगड आणि खरबूज
पूर्ण कलिंगड किंवा खरबूज कापण्यापूर्वी काही काळ बाहेर ठेवता येतं. कापल्यानंतर मात्र ते झाकून फ्रिजमध्ये ठेवणं आवश्यक आहे.

सोपा नियम
कच्ची, पिकायची फळं बाहेर; पिकलेली, लवकर खराब होणारी किंवा कापलेली फळं फ्रिजमध्ये, असा साधारण नियम लक्षात ठेवता येतो. मात्र फळाचा प्रकार, घरातील तापमान आणि ते किती पिकले आहे यानुसार साठवणूक बदलता येते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar