Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोर्तुगाल,स्पेन,स्वित्झर्लंड राऊंड ऑफ 16 मध्ये

पोर्तुगाल,स्पेन,स्वित्झर्लंड राऊंड ऑफ 16 मध्ये

न्यूयॉर्क: फिफा विश्वचषकात पुन्हा तीन संघांनी राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला आहे.पोर्तुगालने क्रोएशियाचा,स्पेनने ऑस्ट्रियाचा तर स्वित्झर्लंडने अल्जेरियाचा पराभव करीत फिफा विश्वचषकात आगेकूच केली आहे.

राऊंड ऑफ 32 मधील सर्वाधिक रंगतदार लढतींपैकी एक ठरलेल्या सामन्यात पोर्तुगालने अखेरच्या क्षणांतील गोलच्या जोरावर क्रोएशियाचा 2-1 असा पराभव करत अंतिम 16 मध्ये धडक मारली. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. दुसर्‍या सत्राच्या 53व्या मिनिटाला इव्हान पेरिशीचने जोसिप स्टॅनिशीचच्या पासवर गोल करून क्रोएशियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर 68व्या मिनिटाला व्हीएआरच्या निर्णयानंतर मिळालेल्या पेनल्टीवर क्रिस्टियानो रोनाल्डोने अचूक फटका मारत विश्वचषकातील आपल्या कारकिर्दीतील पहिला नॉकआउट गोल नोंदवला आणि सामना 1-1 असा बरोबरीत आणला. अतिरिक्त वेळेच्या चौथ्या मिनिटाला (90+4) राफाएल लेआओच्या अचूक क्रॉसवर गोंसालो रामोसने हेडरद्वारे विजयी गोल करत पोर्तुगालला 2-1 असा थरारक विजय मिळवून दिला. उत्तरार्धात क्रोएशियाचा आणखी एक गोल व्हीएआरनंतर बाद ठरल्याने सामना अधिकच नाट्यमय ठरला. या विजयामुळे पोर्तुगालची पुढील फेरीत स्पेनशी गाठ पडणार आहे.

स्पेनचा ऑस्ट्रियावर विजय

स्पेनने एकतर्फी वर्चस्व गाजवत ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. सुरुवातीपासूनच चेंडूवरील नियंत्रण राखणार्‍या स्पेनने सातत्याने आक्रमणे करत ऑस्ट्रियाच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला. मिकेल ओयार्झाबाल36 आणि 89 व्या मिनिटाला दोन गोल करत सामन्याचा नायक ठरला, तर पेद्रो पोरोने 66 व्या मिनिटाला एक शानदार गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पेनच्या भक्कम बचावामुळे ऑस्ट्रियाला संपूर्ण सामन्यात लक्ष्यावर एकही फटका मारता आला नाही. लामिन यामालनेही आपल्या वेगवान खेळाने अनेक संधी निर्माण केल्या. या दमदार विजयामुळे स्पेनचा आत्मविश्वास उंचावला असून पुढील फेरीत त्यांचा सामना पोर्तुगालशी होणार आहे.

स्वित्झर्लंडची अल्जेरियावर 2-0 अशी मात

व्हॅन्कुव्हर येथे झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडने अल्जेरियावर 2-0 अशी मात करत तब्बल 1938 नंतरचा विश्वचषकातील नॉकआउट विजय मिळवला. सामन्याच्या 10व्या मिनिटाला ब्रिल एम्बोलोने गोल करत स्वित्झर्लंडला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अल्जेरियाने पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र स्विस बचावफळीने त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवले. उत्तरार्धात डॅन न्डोयेने 46 व्या मिनिटाला दुसरा गोल करत विजय निश्चित केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar