Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रीतम अँड पेड्रोमधून देशभरातील शाळांमध्ये सायबर सुरक्षेची जनजागृती

प्रीतम अँड पेड्रोमधून देशभरातील शाळांमध्ये सायबर सुरक्षेची जनजागृती

जच्या डिजिटल युगात मुले दररोज सरासरी चार तास ऑनलाइन घालवत असल्याने डिजिटल सुरक्षितता ही केवळ घरापुरती मर्यादित चिंता न राहता देशासमोरील एक महत्त्वाचा विषय बनली आहे. याच पार्श्वभूमीवर, राजकुमार हिरानी फिल्म्स निर्मित आणि जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणारी समीक्षकांची प्रशंसा मिळालेली 'प्रीतम अँड पेड्रो' ही मालिका देशभरातील हजारो शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी व्यापक अभियान राबवत आहे.

अभ्यासानुसार, भारतातील सुमारे 33 % सायबर बुलिंग किंवा ऑनलाइन शोषणाचा काही ना काही प्रकार अनुभवावा लागला आहे. 'प्रीतम अँड पेड्रो' ही मालिका सायबर गुन्हे, डिजिटल गोपनीयता आणि जबाबदार ऑनलाइन वर्तन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रभावीपणे भाष्य करते. मुलांना सहज समजेल अशा रंजक कथानकातून ही मालिका ऑनलाइन सुरक्षिततेचे महत्त्वपूर्ण धडे देते. डिजिटल सुरक्षेबरोबरच ही मालिका सहानुभूती, मानसिक खंबीरपणा, डिजिटल जगातील सकारात्मक वर्तन आणि ऑनलाइन छळाविरोधात ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा देते.

देशव्यापी शैक्षणिक उपक्रम

मालिकेचा संदेश प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभरात एक व्यापक संयुक्त शैक्षणिक अभियान राबवण्यात येत आहे. भारतातील आघाडीचे शैक्षणिक व्यासपीठ EducationWorld आणि DAV United या संस्थांनी एकत्र येत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा निर्धार केला आहे.

या राष्ट्रीय उपक्रमाअंतर्गत शाळांमध्ये मालिकेचे विशेष प्रदर्शन, मार्गदर्शित वर्गचर्चा, तसेच पालक आणि शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून 'प्रीतम अँड पेड्रो' ही मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणारे प्रभावी शैक्षणिक साधन ठरत आहे.

कथाकथनाच्या प्रभावी माध्यमाचा वापर करून हा संयुक्त उपक्रम तंत्रज्ञानाविषयीची भीती दूर करत विद्यार्थ्यांना सुरक्षित, जबाबदार आणि जागरूक डिजिटल नागरिक बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar