Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रामदेव बाबांच्या पतंजलीची नवी झेप; आयुर्वेद, FMCG सेक्टरनंतर विमा क्षेत्रात पदार्पण

रामदेव बाबांच्या पतंजलीची नवी झेप; आयुर्वेद, FMCG सेक्टरनंतर विमा क्षेत्रात पदार्पण

वी दिल्ली : आयुर्वेद क्षेत्रात मातब्बर असलेल्या बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या पतंजली समूहचे अस्तित्व अधिक बळकट होणार आहे. कारण पतंजली आता विमा क्षेत्रात पदार्पण करत आहे.

पतंजली आयुर्वेद आणि धर्मपाल सत्यपाल समूहाला 'मॅग्मा जनरल इन्शुरन्स'मधील हिस्सा खरेदी करण्यासाठी विमा नियामक आयआरडीएआयकडून (IRDAI) कडून परवानगी मिळाली आहे. कंपनीने बुधवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत हे स्पष्ट केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या व्यवहाराचे मूल्य अंदाजे 4 हजार 500 कोटींचे असून IRDAI ने 28 जुलै 2026 रोजीच्या पत्राद्वारे या अधिग्रहणाला हिरवा कंदील दाखवला. ही मंजुरी पत्र जारी झाल्याच्या तारखेपासून पुढील 3 महिन्यांसाठी वैध असेल. Patanjali ventures into a new insurance sector

पतंजलीचा 73.6 टक्के हिस्सा

पतंजली आयुर्वेद 73.6 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे तर धर्मपाल सत्यपाल समूह 24.5 टक्के हिस्सा ताब्यात घेईल. यापूर्वी, सनोटी प्रॉपर्टीज (अदार पूनावाला समूह) ही या कंपनीतील सर्वात मोठी भागधारक होती. IRDAI ची मंजुरी मिळाल्यानंतर पतंजली आता मॅग्मा जनरल इन्शुरन्सची प्रमोटर कंपनी बनेल या व्यवहाराची सुरुवात मार्च 2025 मध्ये झाली, जेव्हा पतंजली-नेतृत्वाखालील खरेदीदार समूह आणि विद्यमान भागधारक यांच्यात शेअर खरेदी करार (SPA) करण्यात आला. कंपनीने 12 मार्च 2025 रोजी शेअर बाजारांना याबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर, नियामक छाननी प्रक्रियेत विलंब झाल्यामुळे, कराराची अंतिम मुदत 12 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली होती.

करार झाल्यापासून, हा व्यवहार जवळपास 16 महिने नियामक छाननी प्रक्रियेत अडकून पडला होता. आयआरडीएआयकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर, आता मालकी हक्क हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. खरेदीदार समूहाला आता तीन महिन्यांच्या निश्चित कालावधीत शेअर्सचे हस्तांतरण पूर्ण करावे लागेल आणि आयआरडीएआयने घातलेल्या अटींची पूर्तता करावी लागेल.

मॅग्मा इन्शुरन्सच्या मालकी हक्कात बदल होणार

सर्व आवश्यक औपचारिक बाबी, कायदेशीर प्रक्रिया आणि कराराशी संबंधित अटींची पूर्तता झाल्यानंतर, मॅग्मा जनरल इन्शुरन्सच्या मालकी हक्काचे हस्तांतरण पूर्ण होईल. यामुळे, विमा क्षेत्रात बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या पतंजली समूहाचे अस्तित्व बळकट होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar