Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रोजच्या स्वयंपाकासाठी स्टील की लोखंडाची कढई वापरावी?

रोजच्या स्वयंपाकासाठी स्टील की लोखंडाची कढई वापरावी?

अॅल्युमिनियमच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाल्ल्यास अनेक व्याधी होण्याचा धोका असतो. त्यामुळे आता डॉक्टरही लोखंड किंवा स्टीलच्या पातेल्यात अन्न शिजवून खाण्याचा सल्ला देत आहेत. पण तरीही जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

कारण लोखंड आणि स्टील या दोन्ही धातुंचे गुणधर्मही वेगळे आहे. त्यामुळे त्यांचे उपयोग आणि फायदेही वेगळे आहेत. best bowl for your kitchen

लोखंडाची कढई - लोखंडाची कढई रोजच्या वापरासाठी उत्तम आहे. यात भाज्या, भाजी, पोहे, उपमा, उत्कृष्ट बनतात. तसेच हे पदार्थ जेव्हा शिजत असतात तेव्हा अन्नात अल्प प्रमाणात लोह (Iron) मिसळू शकते, जे लोहाची कमतरता असलेल्या काही लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते. तसेच लोखंडाच्या कढई जास्त वेळ गरम राहत असल्याने उष्णता जास्त वेळ टिकवून ठेवते, त्यामुळे पदार्थ छान शिजतात.
योग्य प्रकारे सीझनिंग केल्यास लोखंडाच्या कढईत कमी तेलातही चवीष्ट स्वयंपाक करता येतो. रोजच्या कोरड्या किंवा परतून बनवायच्या पदार्थांसाठी लोखंडाची कढई वापरणे फायदेशीर आहे. तसेच ती धुतल्यानंतर लगेच कोरडी करून हलका तेलाचा थर लावल्यास गंज येत नाही. म्हणूनच लोखंडाची कढई रोजच्या भाज्या व पोळीसारख्या पदार्थांसाठी वापरावी.

स्टीलची कढई - स्टीलची कढई गॅसवर ठेवल्यानंतर लगेच गरम होते. त्यामुळे झटपट शिजणाऱ्या पदार्थांसाठी स्टीलची कढई उत्तम पर्याय आहे. विशेष करून आमटी, सांबार, कढी, टोमॅटो किंवा चिंच असलेले आंबट पदार्थ. या पदार्थांसाठी स्टीलची कढई योग्य असते. तसेच यात दूध किंवा दुधाचे पदार्थ सहज बनवता येतात. स्टीलच्या भांडी स्वच्छ करणेही सोपे असते. त्यामुळे कमी देखभाल लागते आणि स्टील गंजतही नाही. यात आंबट आणि द्रव पदार्थ सहज बनवता येतात. स्टीलची कढई आमटी, कढी व आंबट पदार्थांसाठी वापरावी.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar