Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांचा अमेरिकचा 17 दिवसीय दौरा, का होतोय विरोध?

RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांचा अमेरिकचा 17 दिवसीय दौरा, का होतोय विरोध?

वी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे सध्या अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन (UK) या तीन देशांच्या 17 दिवसीय महत्त्वाच्या विदेश दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर या जागतिक संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. एकीकडे या कार्यक्रमापूर्वी हिंदू अमेरिकन फाउंडेशनने सुरक्षा सल्लागार सूचना (Advisory) जारी केली आहे. कारण, सरसंघचालक भागवत यांच्या कार्यक्रमाला न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्यासह काही संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे, हिंदू अमेरिकन फाउंडेशनने कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे, आजूबाजूच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे आणि कोणत्याही प्रकारचा संघर्ष टाळण्याचे आवाहन केले आहे. RSS Mohan Bhagwat

डॉ. मोहन भागवत यांचा दौरा कशासाठी?

डॉ. मोहन भागवत यांचा अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन या देशांत 17 दिवसीय दौरा असणार आहे. या आंतरराष्ट्रीय दौऱ्यादरम्यान मोहन भागवत परदेशातील भारतीय नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तसेच, त्यांच्यातील भ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच, 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन अंतर्गत एक भव्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला 5 हजारांहून अधिक भारतीय वंशाचे लोक उपस्थित राहण्याची शक्यता असून न्यूयॉर्कमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.

डॉ. मोहन भागवत यांच्या दौऱ्याचा वाद काय?

डॉ. मोहन भागवत यांच्या दौऱ्यावरून अमेरिकेत राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठा वाद सुरू झाला आहे. न्यूयॉर्क शहराचे नवनियुक्त महापौर झोहरान ममदानी यांनी या कार्यक्रमाला जाहीर विरोध केला. त्यांनी सांगितले की, ते अशा विचारसरणीला पाठिंबा देत नाहीत. पण, हा एक खाजगी कार्यक्रम असल्याने शहर प्रशासनाला तो रद्द करण्याचा अधिकार आहे की नाही? याबाबत त्यांनी अनिश्चितता दर्शवली. तसेच, अमेरिकेतील काही मानवाधिकार संघटना आणि संस्थांनी या दौऱ्याला विरोध केला असून आरएसएसवर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे. या संघटनांमध्ये हिंदूज फॉर ह्यूमन राइट्स, इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल आणि इंटरफेथ सेंटर ऑफ न्यूयॉर्क यांचा समावेश आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar