Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोन्याचे दर का कोसळले? पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा

सोन्याचे दर का कोसळले? पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. या काळात हजारोंनी सोन्याची किंमत कमी झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (21 नोव्हेंबर) याच पार्श्वभूमीवर एक मोठे विधान केले आहे.

काही महिन्यांपूर्वी सोन्याची खरेदी कमी करा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते. त्याची आठवण लखनौमध्ये झालेल्या भाषणात काढली. त्यामुळे आता त्यांच्या विधानाची देशात चांगलीच चर्चा होत आहे.

शनिवारी (21 नोव्हेंबर) लखनौमध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "मी वर्षभरापूर्वी देशवासियांना आवश्यकता नसल्यास सोने खरेदी न करण्याबाबत आवाहन केले होते. पण, त्यावेळी काही लोकांनी माझ्या आवाहनाची खिल्ली उडवली होती. पण आता सोन्याचे दर घसरल्यानंतर माझा सल्ला ऐकल्याने आपले पैसे वाचले, असे लोक सांगत आहेत. लोकांनी माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत सोने कमी प्रमाणात खरेदी केले." असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचाही उल्लेख केला. " लालबहादूर शास्त्री यांनी देशातील लोकांना आठवड्यातून एक वेळचे जेवण सोडण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी लोकांनी त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला होता. आजही देशातील लोक एखाद्या आवाहनाला तितक्याच चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणले की, "देशाचे भविष्य फक्त पदवीमुळे नाही तर कौशल्यामुळे घडणार आहे. स्वातंत्र्यानंतरही देश दीर्घकाळापर्यंत गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर येऊ शकलेला नाही. त्यामुळेच नोकऱ्यांमध्ये डिग्री आणि सर्टिफिकेटला अधिक महत्त्व दिले गेले. तसेच गुणवत्ता आणि कौशल्य मागे पडले." असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात त्यांनी आयटीआयच्या विद्यार्थ्यांचेही कौतुक केले. "तुम्ही आयटीआयमध्ये शिकलेली कौशल्ये ही आज भारताची ऊर्जा आहेत. तुम्ही एक विकसित भारत घडवाल. हे स्पष्टपणे समजून घ्या, ज्यांच्याकडे कौशल्ये आहेत, त्यांचा रोजगार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही." असे म्हणत त्यांनी मुलांना प्रोत्साहन दिले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar