Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
स्टोक्स बीबीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ?

स्टोक्स बीबीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ?

सिडनी: ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग 2026-27 हंगामापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, स्टोक्सला करारबद्ध करण्यासाठी अनेक फ्रँचायझींमध्ये मोठी चुरस सुरू असून, त्याला सुमारे 6 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर इतक्या विक्रमी मानधनाचा करार मिळू शकतो.

तसे झाल्यास तो बीबीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरेल.

सिडनी सिक्सर्स संघ स्टोक्सला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. बिग बॅश लीगने यंदापासून परदेशी खेळाडूंच्या करार पद्धतीत केलेल्या बदलांमुळे संघांना स्टार खेळाडूंवर मोठी बोली लावण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे स्टोक्ससाठी विक्रमी बोली लागण्याची शक्यता अधिक बळावली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर स्टोक्स आता जगभरातील फ्रँचायझी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी तो 2014-15 हंगामात मेलबर्न रेनेगेड्सकडून बिग बॅशमध्ये खेळले होता. तब्बल दशकानंतर तो पुन्हा बीबीएलमध्ये दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar