Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
.तर रेखा झाली असती मिसेस इमरान खान

.तर रेखा झाली असती मिसेस इमरान खान

हिंदी चित्रपटसृष्टीसाठी रेखा हे नाव नवीन नाही. पण तरीही अभिनयापेक्षा रेखा यांचे नाव बिग बीं अमिताभ बच्चन यांच्याबरोबरील नात्यामुळे कायम चर्चेत राहीले. मात्र बिग बींनंतरही रेखा यांच्या आयुष्यात विनोद मेहरा, मुकेश अग्रवाल, यासारखे पुरुष आले.

पण त्यांचे प्रेम रेखाला कधी लाभलेच नाही. यामुळे आजही रेखा एकाकी जीवन जगत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान क्रिकेटर इमरान खान यांचे देखील रेखावर प्रेम होते. ते तिच्याशी निकाह करू इच्छित होते. पण हे नातेही अपूर्णच राहीले .नाहीतर रेखा आज मिसेस इमरान खान यांच्या झाल्या असत्या. Actress Rekha Love Life

७० ते ८० दशकात रेखा बॉलीवूडमधील लेडी सुपरस्टार म्हणून ओळखल्या जात. देखणं रुप आणि अष्टपैलू अभिनयाने रेखाने बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. बिग बी ही रेखाच्या प्रेमात होते. रेखा यांच्या आयुष्यातील तो सुवर्णकाळ होता. बिग बीं बरोबरचे त्यांचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत असल्याने निर्माते तारखा मिळवण्यासाठी त्यांच्या घराबाहेर रांगा लावत. पण बिग बी विवाहीत असल्याने त्यांचे नात जास्त काळ टिकलं नाही. त्याचा परिणाम दोघांच्याही कार्यकिर्दीवर झाला. दोघांनी चित्रपटात एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला.

पण रेखावर प्रेम करणारे फक्त देशातच नाही तर परदेशातही होते. त्यात पाकिस्तानी क्रिकेटर इमरान खान हे देखील होते. त्यावेळी जगातील देखण्या पुरुषांमध्ये हमरान खान यांचा समावेश व्हायचा. सामान्य तरुणीच नाही तर बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री इमरान यांच्या दिवाण्या होत्या. यात झीनत अमान, शबाना आझमी यांचेही नाव येते. पण इमरान यांचे मन मात्र रेखात गुंतले. यादरम्यान फिल्मी पार्ट्यांमध्ये रेखा आणि इमरान यांची भेट झाली होती. त्यानंतर इमरान आणि रेखा यांच्यात जवळीक निर्माण झाली. अनेक पार्ट्या , कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसू लागले. इमरान भारतात आल्यावर रेखाला शूटींग सेटवर जाऊन भेटत. अनेकवेळा जूहू बीचवर दोघे निवांत गप्पा मारत.

यादरम्यान दोघांच्या लग्नाच्या अफवाही पसरल्या. रेखा यांच्या आईला इमरान खान पसंत होते. त्यांनी साखरपुडा केला अशाही अफवा त्याकाळी पसरल्या. पण नंतर रेखा आणि इमरान कधीच एकत्र दिसले नाही. यादरम्यान इमरान यांचे नाव बॉलीवूडच्या इतर अभिनेत्रींबरोबर जोडले गेले. यावर इमराननेही अभिनेत्रीबरोबर कधीही लग्न करणार नाही असेही म्हटले होते. १९८५ मध्ये द स्टार मध्ये यावर बातमीही प्रसिद्ध झाली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar