Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
.तर त्यांना हे दिवस पाहता आले नसते, 75 व्या वाढदिवशी एकनाथ खडसेंचे आजच्या राजकारणावर परखड भाष्य

.तर त्यांना हे दिवस पाहता आले नसते, 75 व्या वाढदिवशी एकनाथ खडसेंचे आजच्या राजकारणावर परखड भाष्य

ळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांचा आज रविवारी (30 ऑगस्ट) 75 वा वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर येथे मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री रामदास आठवले व अन्य नेतेमंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमातही खडसेंनी आपल्या शैलीत जोरदार भाषण केले. मात्र, यावेळी त्यांनी आजच्या राजकारणावर परखड भाष्य करत खंत व्यक्त केली. काँग्रेसच्या काळात जर कार्यकर्ते सैरभैर झाले असते, इकडे सोडून सत्तेकडे वळले असते, तर कदाचित आज राज्यामध्ये ज्यांचे सरकार आले, त्यांना हे दिवस पाहता आले नसते, अशा शब्दांत खडसेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

75 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, आजची परिस्थिती पाहत आहे. सरकार येतात - बदलतात, कार्यकर्ते येतात - बदलतात, इकडचे तिकडे जातात, तिकडचे इकडे जातात. 2000 ते 2014 या कालखंडामध्ये म्हणजे 14 वर्ष या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार नव्हते. काँग्रेसचे सरकार होतं, पण सरकार नसताना विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची मानसिकता टिकवून ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने त्या कालखंडात झाले आणि म्हणून पुढे पाया मजबूत झाला आणि सरकार आले. त्या कालखंडामध्ये कार्यकर्ते जर सैरभैर झाले असते, इकडे सोडून सत्तेकडे वळले असते, तर कदाचित आज राज्यामध्ये सरकार आलंय, त्यांना हे दिवस पाहता आले नसते. राजकारणात फेरबदल होत असतात. ज्याच्या नशिबात आहे, ते त्याला मिळत असते. ज्याच्या नशिबात आहे, ते घडत असते, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.

तसेच यावेळी खडसेंनी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याबाबतही वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, सारं करत असताना विशेषतः खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये मला बळ कोणी दिले असेल, तर ते प्रमोद महाजनांनी. प्रमोद महाजनांनी मला 90 ते 95 ला तिकीट देण्याच्या संदर्भामध्ये, 95 ते 99 च्या कालखंडात मंत्री होण्याच्या संदर्भामध्ये सहकार्य केले. आज या मंडळींचे राजकारण आणि आत्ताचे राजकारण यावर बोलणार नाही, पण हे पाहून मला वेदना होतात. कुठे प्रमोद महाजन यांचे राजकारण, कुठे गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय उत्तमराव पाटील, नानासाहेब पाटील, अण्णा डांगे, ना. सं. फरांदे, कितींची नावे घेऊ? ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये तो पक्ष रुजवण्यासाठी प्रयत्न केला. लहानाचे मोठे करण्याचा प्रयत्न केला, असेही यावेळी एकनाथ खडसे यांनी आवर्जून सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar