रोजच्या धकाधकीच्या रुटीनमधून थोडा ब्रेक घेत सोलो ट्रिपला जाण्याचा ट्रेंड तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांमध्ये वाढला आहे. निसर्गात काही क्षण एकांतात घालवत स्वत:चा शोध घेणे हा यामागचा उद्देश असतो.
यादरम्यान येणारे अनुभव आयुष्य समृद्ध करतात असे अनेकांचे म्हणणे आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की वयाच्या तिशीत केलेल्या सोलो ट्रिपमुळे आलेला अनुभव हा चाळीशीनंतर केलेल्या सोलो ट्रिपपेक्षा पाच कारणांनी वेगळा असतो. त्याची कारणेही वेगळी आहेत.
स्व:तला वेळ
रोजच्या आयुष्यात आपल्यासोबत सतत कोणी ना कोणी असतचं जसे की घरी कुटुंब, नातेवाईक,ऑफिसमध्ये सहकारी, मित्रपरिवार. त्यामुळे स्व:तसाठी असा वेळ सहसा कोणाला मिळत नाही. यामुळे जर तुम्ही तिशीत असाल तर तुम्हाला सोलो ट्रिप नक्कीच करायला हवी. कारण त्यामुळे घर आणि बाहेरचे जग तेथील माणसं यातील फरक कळतो.
आत्मविश्वास
सोलो ट्रिपमध्ये एकट्याने निर्णय घेण्याचा आत्मविश्वास मिळतो. पण जर चाळीशीनंतर तुम्ही सोलो ट्रिप केलीत तर आधीच अनुभवाची शिदोरी तुमच्या पाठीशी असते त्यामुळे परिस्थिती हाताळणे तुम्हाला सहज शक्य होतं. माणसांची ओळख झालेलीच असते त्यामुळे नवीन काही शिकण्यासारखं राहत नाही.
कम्फर्ट झोन
वयाची तिशी म्हणजे शाळा कॉलेज पूर्ण करून करियर घडवणारी करणारे तरुणाई. यावयात मुल स्वतला घडवत असतात. घर, शाळा, कॉलेज यातला कम्फर्ट झोन संपलेला असतो. यामुळे सोलो ट्रॅव्हल करणं, एकट्याने प्रवासाला जाणं त्यांच्यासाठी रोमांचक असते. .यातून मुलं घडतात.
नवीन माणसे
सोलो ट्रॅव्हलमध्ये नवीन नवीन माणस भेटत असतात. त्यामुळे मुलांचे नेटवर्क वाढते. ओळख होते. अनोळखी माणस कशी वागतात. आपली माणस कशी असतात हे मुलांना कळत . अनुभवातून मुलांना चांगल वाईट कळतं.

