Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तुमच्या खिशाला बसणार चाप, 1 ऑगस्टपासून बदलणार हे नियम; वाचा सविस्तर

तुमच्या खिशाला बसणार चाप, 1 ऑगस्टपासून बदलणार हे नियम; वाचा सविस्तर

मुंबई : जुलै महिना संपला असून 1 ऑगस्ट 2026 पासून देशभरात अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि दैनंदिन व्यवहारांशी संबंधित नियम बदलणार आहेत. या बदलांचे थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर, बँकिंग व्यवहारांवर, प्रवासावर आणि आर्थिक नियोजनावर होणार आहे.

रेल्वे तिकीट बुकिंगपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती, आयकर रिटर्न, क्रेडिट कार्डचे नियम आणि आधारशी संबंधित KYC प्रक्रियेपर्यंत अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. नवीन महिन्याची सुरुवात करण्यापूर्वी हे नियम जाणून घेणे आवश्यक आहे. नाहीतर, दंड किंवा इतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 5 major changes from 1 august 2026

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करतात.

1 ऑगस्टलाही घरगुती (14 किलो) आणि व्यावसायिक (19 किलो) एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जाणार आहे. अमेरिका-इराण तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढले आहेत. मार्चमध्ये घरगुती गॅस 60 रुपयांनी महागला होता. तर, जूनमध्ये कमर्शियल गॅसचे दर वाढले होते.

त्यानंतर आता 1 ऑगस्ट रोजीघरगुती आणि कमर्शियल गॅसच्या किमतीत होणाऱ्या चढ-उताराचा थेट परिणाम स्वयंपाक घराच्या बजेटवर होणार आहे. भारतीय रेल्वेने 1 ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुकिंगच्या पद्धतीमध्ये महत्त्वाचा बदल केला. नव्या नियमांनुसार, आता रेल्वे स्टेशनवरील टोकन देण्याची वेळ आणि तत्काळ बुकिंग सुरू होण्याची वेळ एकच असणार आहे. नव्या नियमानुसार तत्काळ बुकिंग सुरू होण्याच्या वेळेलाच टोकन वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

यामुळे, आरक्षण केंद्रांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. यापूर्वी टोकन घेण्यासाठी आणि तिकीट काढण्यासाठी वेगवेगळ्या वेळेला केंद्रावर जावे लागत होते. नव्या व्यवस्थेमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि तिकीट बुकिंग अधिक सुलभ होणार आहे. 1 ऑगस्टपासून अनेक बँका त्यांच्या क्रेडिट कार्डच्या अटी आणि नियमांमध्ये बदल करू शकतात.

यामध्ये रिवॉर्ड पॉइंट्स, वार्षिक शुल्क, सेवा शुल्क आणि इतर सुविधांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही बँका मुदत ठेवींच्या (FD) व्याजदरांमध्येही बदल करू शकतात. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दराबाबत निर्णय झाल्यास त्याचा परिणाम कर्जावरील EMI आणि FD वरील व्याजदरांवरही होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेकडून जारी होणाऱ्या नव्या अटी तपासणे आवश्यक आहे.

नोकरदारांसाठी (ITR-1 आणि ITR-2) आर्थिक वर्ष 2026 - 27 चे आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे. 1 ऑगस्टपासून जे लोक रिटर्न भरणार नाहीत, त्यांना लेट फी भरावी लागेल. बिझनेस आणि टॅक्स ऑडिट लागू नसलेल्यांसाठी अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2026 तर टॅक्स ऑडिट असणाऱ्यांसाठी 31 ऑक्टोबर 2026 ही मुदत आहे. ग्राहक ओळख पडताळणी म्हणजे केवायसी प्रक्रियेतही महत्त्वाचा बदल होणार आहे. बँका, विमा कंपन्या आणि ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या Central Know Your Customer (CKYC) 2.0 प्रणाली लागू करणार आहेत. या नव्या व्यवस्थेमुळे ग्राहकाच्या संमतीनंतर संबंधित संस्थांना केवायसीची माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे, वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज कमी होईल आणि फसवणूक रोखण्यासही मदत होईल.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar