Saturday, 20 Jul, 9.20 am आपलं व्यासपीठ

मुख्य पान
एकता वर्ल्ड करणार ऍक्सेस लाईफच्या सहयोगासह कर्करोगाशी झुंज देत असलेल्या मुलांना आधार देण्यासाठी अद्वितीय कार्यक्रमाचे आयोजन

शालेय शिक्षण, क्रीडा व महाराष्ट्राचे युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या द्वारे कार्यक्रम सुशोभित होणार असून, 'आर्टिस्ट्स फॉर अ कौझ' विविध शैलीच्या प्रसिद्ध कलाकारांना एकत्र आणणार आहे

मुंबई(प्रतिनिधी) : मनोरंजन, संगीत, नृत्य आणि आनंदासह पूर्ण झालेल्या फन फिल्ड इव्हनिंग २१ जुलै २०१९ रोजी नियोजित आहे. बालपण कर्करोग सेवा केंद्र ऍक्सेस लाइफच्या समर्थनासह समीर दाते द्वारे आयोजित आर्टिस्ट्स फॉर अ कौझ, एकता वर्ल्ड सहित कर्क रोगाशी झुंज देत असलेल्या मुलांना आधार देण्याकरिता निधी उभारण्यासाठी विविध शैलीतील कलाकारांना परफॉर्म करण्यास एकत्र आणणार आहे.

शालेय शिक्षण, क्रीडा व महाराष्ट्राचे युवक कल्याण मंत्री आशिष शेलार या कारणासाठी आपला आधार दर्शवित कार्यक्रमाला सुभोभित करणार आहे. जागतिक स्तरावर प्रख्यात गायक समीर आणि दीपाली दाते, भारतातील पहिली महिला तबला वादक अनुराधा पाल, सुप्रसिद्ध आणि उत्कृष्ट चित्रकार संगीता बबानी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध नृत्यांगना झिया नाथ काही कलाकार आहेत जे संगीत, कला आणि नृत्यच्या मिश्रणासहित मोठ्या कौझसाठी आशा वाढवण्याकरीता एकत्र येतील.

या प्रसंगी बोलताना एकता वर्ल्डचे अध्यक्ष श्री अशोक मोहनानी यांनी म्हटले, "फरक आणण्यासाठी नेहमीच आनंद वाटतो आणि विशेषकरून त्यांच्यासाठी ज्यांना त्याची आवश्यकता असते. एकता वर्ल्ड अशा अधिक पुढाकारांसाठी आशा वाढवण्याची अपेक्षा करीत आहे."

ऍक्सेस लाइफ असिस्टन्स फाऊंडेशन, सेक्शन ८ कंपनी म्हणून नोंदणीकृत असलेली एक भारतीय नॉन-प्रॉफिट संस्था, मुंबईत आपल्या मुलांच्या कर्करोग उपचारांसाठी येणाऱ्या कुटुंबांना बहु-अनुशासनात्मक समर्थन सेवा प्रदान करते. ते कर्करोगासाठी उपचार घेत असलेल्या मुलांसाठी त्यांच्या पालक किंवा काळजीवाहू सह प्रेमळ आणि तात्पुरते घर प्रदान करते.

ऍक्सेस लाइफने चेंबूरमध्ये जून २०१४ ला आपले पहिले केंद्र उभारले होते आणि मुंबई व ठाणे येथे ६ बालपण कर्करोग सेवा केंद्र आहेत. त्यांच्या ६ केंद्रांद्वारे त्यांनी ३५० हून अधिक कर्करोग ग्रस्त वंचित बालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समग्र आधार दिला आहे.

आयोजक प्रेक्षकांकडून देणग्याद्वारे कोट्यवधी रुपये उभारण्याची आशा करत आहेत, जेणेकरुन ऍक्सेस लाईफला त्यांच्या केंद्रात अधिक मुलांना सहाय्य करण्यास आणि त्यांना चांगल्या मानक सेवा प्रदान करण्यास मदत करेल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Aapla Vyaaspith
Top