Sunday, 19 Jan, 8.30 am आपलं व्यासपीठ

मुख्य पान
निलांबरी सुधाकर कांबळे यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार

मुंबई( प्रतिनिधी) : शासनमान्य बोधी ट्री एज्युकेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार मुंबई येथील एस्.एल् अँड.एस्.,एस्.,गर्ल्स हायस्कूल शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ.निलांबरी सुधाकर कांबळे यांना त्यांच्या सन२०१९-२०२०या वर्षात शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सोमवार ,१३ जानेवारी २०२० रोज़ी औरंगाबाद येथे तापड़िया नाट्य मंदिरात राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सहाय्यक शिक्षिका सौ.निलांबरी सुधाकर कांबळे यांना त्यांच्या सन २०१९-२०२० या वर्षात शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे .तापड़िया नाट्यमंदिरात रंगलेल्या भव्य दिव्य जीवन गौरव पुरस्कार सोहळयाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आम्बेडकर मराठवाडा विद्यापिठाचे माज़ी अधिष्ठाता प्रा. वाल्मिकी सरवदे ,उद्घाटक औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा विद्यापिठाचे अधिसभा सदस्य प्रा. सुनील मगरे ,औरंगाबाद प्राथमिक जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर व जीवन गौरवचे संपादक रामदास वाघमारे, मुंबई जिल्हा सहसंपादिका सौ. गीता विश्वास केदारे व संपूर्ण जीवन गौरव टीम आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक पुरस्कर्त्याला शाल,श्रीफळ,जीवन गौरव सन्मान चिन्ह, मानपत्र व सन्मानपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले.जीवन गौरवच्या चौथ्या वर्धापन दिनी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Aapla Vyaaspith
Top