Wednesday, 11 Dec, 5.49 pm आपलं व्यासपीठ

मुख्य पान
पुण्यातील बालेवाडी येथे आयोजित पहिल्या नॅशनल रँकिंग पिकलबॉल टूर्नामेंटमध्ये महाराष्ट्र व राजस्थानचा उत्तम प्रदर्शन

पुणे (प्रतिनिधी) : रमेश वाय प्रभु (आरवायपी) स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन (एआयपीए) च्या वतीने आयोजित पहिली नॅशनल रँकिंग पिकलबॉल टूर्नामेंट पुण्याच्या बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स येथे पार पडली.

सुमारे १० राज्यांतील २५० खेळाडूंनी विविध श्रेणी जसे अंडर १८ बॉइज डबल्स, मेन्स सिंगल्स, मेन्स डबल्स, वूमेन्स सिंगल्स, वूमेन्स डबल्स, मिक्स्ड डबल्स आणि अबाव ५० मेन्स डबल्स मध्ये भाग घेतला. विविध इव्हेंट्समध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी ४ सुवर्ण, ३ रौप्य व ६ कांस्यपदक जिंकले तर राजस्थानच्या टीमने ४ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदक जिंकले आणि मध्य प्रदेशच्या टीमने २ सुवर्ण व १ रौप्यपदक जिंकले. विजेत्यांमध्ये साडेतीन लाखाहून अधिक रोख बक्षीस वितरण करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे (एआयपीए) अध्यक्ष श्री. अशोक मोहनानी म्हणाले, "एआयपीएच्या मागील १२ वर्षांच्या अग्रगण्य कार्याचा परिणाम आता दिसून येत आहे, या स्पर्धेला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद याची खात्री देत आहे की पिकलबॉल भारतात नक्कीच टिकेल."

यावेळी बोलताना टूर्नामेंटचे भागीदार श्री. अरविंद प्रभु , छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व आरवायपी फाऊंडेशनचे अध्यक्ष, जे स्वत: क्रीडा उत्साही आहेत, म्हणाले की, "त्यांनी मुली व मुलांमध्ये भेदभाव केले नसून दोघांनाही समान बक्षिसाची रक्कम देण्यात आली आहे. त्यांनी राजस्थानच्या मेघा कपूरचे या स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आणि तिला ५१,००० /- रुपयांचा चेक हस्तांतरण केले. प्रभू पुढे म्हणाले की ही स्पर्धा वार्षिक वैशिष्ट्यपूर्ण असेल आणि या फिटनेस खेळाला संपूर्ण भारतभर मान्यता आणि लोकप्रियता मिळावी यासाठी पुढील वर्षी ते इतर कोणत्या तरी राज्यात आयोजित करण्याचे आश्वासन दिले

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Aapla Vyaaspith
Top