Sunday, 18 Aug, 10.20 am आपलं व्यासपीठ

मुख्य पान
सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी नरेडकोने हाती घेतली चौथी वृक्ष लागवड मोहीम

नॅशनल रिअल इस्टेट बॉडीच्या सहकार्याने ग्रीन स्कायलाईनचे राजदूत श्रीमती अमृता फडणवीस यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्रभर १,५०,००० झाडे लावली

मुंबई (प्रतिनिधी) : श्रीमती. अमृता फडणवीस, ग्रीन स्कायलाईनचे राजदूत आणि महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने डॉ. निरंजन हिरानंदानी, राष्ट्रीय अध्यक्ष नरेडको आणि राजन बांदेलकर, अध्यक्ष, नरेडको महाराष्ट्र यांच्या सहित चौथ्या वृक्षारोपण मोहिमेचे उद्घाटन केले, ज्याच्यात २०२० पर्यंत राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय म्हणून आज नागपुरात १.५ लाख रोपे लावली जात आहेत. खासदार डॉ. विकास महातमे, हिंगणाचे आमदार समीर मेघे, अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हा आणि अभिजीत बंगर, आयएएस, नागपूरचे आयुक्त, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रसंग पार पाडण्यात आला.

"आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सदैव विचार असतो की विकास हा प्रत्येक गावात, प्रत्येक गरीबाच्या घरी आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी पोहोचावा. त्यांचा एक मिशन आहे की २०२२ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात शेतकऱ्यांचा उत्पन्न दुप्पट व्हावा आणि त्यांचा हा ध्येय पूर्ण करण्यासाठी आज नरेडको पुढे आला असल्याचे मला खूप आनंद आहे. नरेडकोशी माझा संबंध मुंबईला गेल्यापासून सुरु झाला आहे. मुंबई हे काँक्रेट जंगल असल्याने बिल्डर्स खाली जागा मिळताच बिल्डिंग बांधतात. पण नरेडको हे पाहते की तिथे हरियाली आणि निसर्ग राहावे.महाराष्ट्रच्या ३३ कोटी वृक्षारोपणाच्या उद्देश्यालाही त्यांनी छान प्रतिसाद दिला असून मागच्या वर्षी १.५ लाख झाले लावून वृक्षारोपण मोहीम राबविल्या आहेत. हा पुढाकार त्यांचा आहे, जिथे ते आपल्याकडे ५००० फळ देणारे झाडे घेऊन आले असून त्यांनी ते स्पॉन्सर देखील केले आहेत. फळझाडे लावल्यास उत्पन्न वाढविण्यात नक्कीच मदत होईल. मला आनंद आहे की फेत्री आज आदर्श ग्राम म्हणून फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतात ओळखला जातो आणि इथून पुढे जाण्यासाठी सायन्टिफिक फार्मिंग वापरात आणणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही नक्कीच मदत करू. आज फेत्री मॉडेल व्हिलेज आहे आणि पुढे तो मॉडेल ऍग्रिकल्चरल व्हिलेज ही बनू शकतो व देशभरातील लोकं फेत्री पाहायला येतील आणि याच पर्यटनातून उत्पन्न निर्माण होईल," असे ग्रीन स्काईलाइनचे राजदूत श्रीमती अमृता फडणवीस म्हणाल्या.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून नरेडको ने वन अधिकाऱ्यांच्या मदतीने नागपूर विभागातील फेत्री, कडवास आणि केळझार या गावातल्या शेतकऱ्यांना फळ देणारी रोपे आणि झाडे दान केली."जागतिक तापमानवाढ आणि भयानक प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्याने नरेडको महाराष्ट्र देशभरात साजरा होणार्‍या वार्षिक आठवडाभर वृक्षारोपण महोत्सव म्हणजेच वन महोत्सवाला चालना देत आहे," असे नरेडको महाराष्ट्रचे अध्यक्ष राजन बांदेलकर म्हणतात.

"नरेडकोने महाराष्ट्रातील हरित फॅब्रिक राखण्याकडे कल दर्शविला आहे. ग्रीन स्काइलाईन हा राज्यातील पर्यावरणीय आरोग्य वाढविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी समर्पित केलेला एक उपक्रम आहे. शहरीकरण आणि विकासाच्या या वेगवान वाढीच्या काळात, व्यक्ती आणि संस्थांनी निसर्गाप्रती असलेली आपली जबाबदारी समजून घेणे आणि अधिक झाडे लावून त्याचे जतन करणे आवश्यक आहे. "नरेडकोमध्ये आम्ही अनेकांना पुढे येऊन निसर्गाच्या संवर्धन व टिकवणुकीसाठी काम करण्याप्रती प्रोत्साहित करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहत आहोत", असेनरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले.

नरेडको महाराष्ट्र पर्यावरण संवर्धनासारख्या सामाजिक जबाबदाऱ्यांप्रती काम करीत आहे आणि मुंबई तसेच मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि महारातष्ट्र राज्यात पर्यावरणाची काळजी घेतली जात असल्याचे सुनिश्चित करून शाश्वत वाढीसाठी वचनबद्ध आहे. ही वृक्षारोपण मोहीम वेगळी आहे कारण ती केवळ वृक्षारोपणच नाही तर झाडे टिकवून ठेवण्यावरही लक्ष केंद्रित करते. त्याचबरोबर हा कार्यक्रम विविध भागधारकांमध्ये निसर्गाप्रती जबाबदारीची संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रच्या वन मंत्रालय यांच्या सहकाऱ्याने नरेडको महाराष्ट्र केवळ झाडे लावणार नाही तर त्यांची काळजी देखील घेणार आहे. रिअल्टरची संस्था नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल महाराष्ट्र सरकारच्या वन मंत्रालयाच्या सहकार्याने गेल्या तीन वर्षांपासून वृक्षारोपण आयोजित करीत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Aapla Vyaaspith
Top