Tuesday, 10 Dec, 9.21 am आपलं व्यासपीठ

मुख्य पान
शामक दावरने साजरा केला विंटर फंक - कलर्स ऑफ इंडिया

मुंबई(प्रतिनिधी) : आधुनिक रंगभूमीवरील रंग साजरे करण्यासाठी वियान कुंद्रा, वरुष्का खुराना, खुशी आणि राजवीर भानुशाली एकत्र आले. शिल्पा शेट्टी, जय भानुशाली आणि शामक दावर यांच्यासह बॉलिवूडच्या स्टार्स हि या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मुंबई, जेव्हा नृत्याची मर्यादित परिभाषा होती तेव्हा शामक दावर यांनी नृत्याचा विस्तार करण्याचे आणि नृत्य करणाऱ्यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ तयार करण्याचे काम केले. " हॅव फीट. विल डान्स " या उद्देशाने सुरू झालेली एक चळवळ आहे. कलर्स ऑफ इंडिया, आधुनिक भारताचा समृद्ध इतिहास आणि अनेक संस्कृती, उत्सव, परंपरा, कला प्रकार या विषयावर - शामक दावर इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (एसडीआयपीए) च्या विद्यार्थ्यांनी विविधतेत ऐक्य साजरा केला.

मुंबईत संध्याकाळी वियान कुंद्रा, वरुष्का खुराना, राजवीर आणि खुशी भानुशाली यांनी परफॉर्मन्स सादर केले. त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिल्पा शेट्टी- कुंद्रा आणि शमिता शेट्टी यांच्यासह ताहिरा कश्यप, जय भानुशाली आणि महि विज, मास्टर मर्जी आणि इतर बर्याच जणांनी विंटर फंक शोमध्ये हजेरी लावली होती.

यावेळी बोलताना श्री.शामक दावर म्हणाले, "विंटर फंक माझ्या खूप जवळचा आहे आणि या सुंदर प्रवासाचा एक भाग ठरलेल्या तुमच्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो. विंटर फंक स्टेजवर अनेक स्टार्स आहेत. 'हॅव फीट. विल डान्स'च्या उद्देशाने सुरू केलेलं हे मिशन पाहणे माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. 'हॅव फीट. विल डान्स' 'आता' हॅव स्पिरिट, विल ट्रायम्फ 'पर्यंत विस्तारला आहे. तसेच या पिढीतील मुलांना भारतीय संस्कृती आणि वारसा यांचे महत्त्व जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच यावर्षी 'कलर्स ऑफ इंडिया' हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. "

Share this:

Related

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Aapla Vyaaspith
Top