Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आर्थिक मदतीने व पत्नीच्या यकृतदानाने वाचला पतीचा जीव; मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरला आधार

आर्थिक मदतीने व पत्नीच्या यकृतदानाने वाचला पतीचा जीव; मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरला आधार

Image Source:(Internet)

मुंबई : आर्थिक अडचणींमुळे उपचार अशक्य झालेल्या अकोला येथील प्रशांत इंगळे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या मदतीमुळे नवे आयुष्य मिळाले.

पत्नी वर्षा इंगळे यांनी यकृताचा काही भाग दान केल्यानंतर मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.

प्रशांत इंगळे हे केबल टाकण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २०२५ मध्ये त्यांना यकृताचा गंभीर आजार असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला; मात्र २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च परवडणारा नव्हता.

यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २ लाख रुपयांची मदत मिळाली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या प्रयत्नांमुळे टाटा ट्रस्टकडून १९.६० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली. त्यामुळे एकूण २१.६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होऊन प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा झाला.

२५ जून २०२६ रोजी नानावटी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने १३ जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते हळूहळू पूर्ववत होत आहेत.

वेळीच मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे उपचार शक्य झाल्याची भावना व्यक्त करत इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक आणि टाटा ट्रस्ट यांचे आभार मानले. रामेश्वर नाईक यांनी गरजू रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat