Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागपूरच्या न्यूरॉन रुग्णालयातील डॉक्टरांचा संशयास्पद मृत्यू; पोलिस तपास सुरू

नागपूरच्या न्यूरॉन रुग्णालयातील डॉक्टरांचा संशयास्पद मृत्यू; पोलिस तपास सुरू

Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील न्यूरॉन रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार यांचा त्यांच्या केबिनमध्ये मृतदेह आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

या घटनेने शहरातही मोठी चर्चा सुरू झाली असून पोलिसांनी प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. चांदेवार हे नेहमीप्रमाणे कामासाठी रुग्णालयात आले होते. रुग्णांची तपासणी आणि इतर वैद्यकीय जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर ते आपल्या केबिनमध्ये गेले. मात्र बराच वेळ लोटल्यानंतरही ते बाहेर न आल्याने सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना चिंता वाटू लागली.

संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी केबिन उघडून पाहिले असता डॉ. चांदेवार हे निश्चल अवस्थेत आढळले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

घटनास्थळाची पाहणी करताना केबिनमध्ये काही इंजेक्शन्स आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तथापि, पोलिसांनी कोणताही अंदाज व्यक्त करण्यास नकार दिला असून सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.

या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आणि इतर तपासणीनंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat