Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागपुरात हाय-प्रोफाइल हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा; 49 जणांवर गुन्हा!

नागपुरात हाय-प्रोफाइल हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा; 49 जणांवर गुन्हा!

साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्तImage Source:(Internet)

नागपूर : शहरातील अवैध हुक्का पार्लरविरोधात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत सदर येथील हॉटेल हेरिटेजमध्ये सुरू असलेली हाय-प्रोफाइल हुक्का पार्टी उधळून लावली.

या कारवाईत 43 ग्राहकांसह हॉटेलचे संचालक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 49 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 3 लाख 57 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः साध्या वेशात हॉटेलमध्ये जाऊन खातरजमा केली. त्यानंतर एनडीपीएस पथक आणि सदर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाचव्या मजल्यावरील अवैध हुक्का पार्लरवर छापा टाकला.

कारवाईदरम्यान 36 पुरुष आणि 9 महिला असे 43 ग्राहक हुक्का पिताना आढळले. याशिवाय हॉटेलचे संचालक गुरप्रीत सिंग हरजिंदर सिंग खंडूजा, व्यवस्थापक संजय चिंचखेडे, पॉल फर्नांडिस, अतुल हीरेखड, नयन साळुंखे यांच्यासह एकूण 49 जणांना आरोपी करण्यात आले. सर्वांच्या ड्रग्ज चाचणीसाठी नमुनेही घेण्यात आले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून 13 हुक्का पॉट, तंबाखू आणि इतर साहित्य असा एकूण 3 लाख 57 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, शहरातील अवैध हुक्का पार्लरविरोधातील विशेष मोहीम यापुढेही सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नागपूर पोलिसांनी दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat