Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागपुरातील गोधनीत क्लोरीन वायूची गळती; नागरिकांना श्वसनाचा त्रास

नागपुरातील गोधनीत क्लोरीन वायूची गळती; नागरिकांना श्वसनाचा त्रास

Image Source:(Internet)

नागपूर : नागपुरातील गोधनी परिसरात कलेक्टर कॉलनीजवळील जलशुद्धीकरण केंद्रात रविवार-मोमवारच्या मध्यरात्री टँकरमधून क्लोरीन वायूची गळती झाल्याची घटना घडली. वायू परिसरात पसरल्याने अनेक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला.

काही नागरिकांना उपचारासाठी मेयो रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले.

हे जलशुद्धीकरण केंद्र नागपूर महापालिकेच्या अखत्यारित नसून गोधनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालविले जाते. गळतीची माहिती मिळताच ओसीडब्ल्यूच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून नियंत्रणाच्या कामात मदत केली. पथकातील नितीन आणि किशोर यांनी स्वयंपूर्ण श्वसन उपकरणाच्या मदतीने धोकादायक परिस्थितीत गळती रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

दरम्यान, पोलिस तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या पथकाने ओसीडब्ल्यू कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे आणि धाडसी कार्याचे कौतुक केले. गळती नियंत्रणात आली असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेमुळे बाधित झालेल्या नागरिकांची नेमकी संख्या निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat