Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रफुल्ल गुडधे यांनी माफी मागावी, अन्यथा...;भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचा इशारा

प्रफुल्ल गुडधे यांनी माफी मागावी, अन्यथा...;भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचा इशारा

Image Source:(Internet)

नागपूर : काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी केलेले आरोप तथ्यहीन असून त्यांनी ४८ तासांच्या आत जाहीर दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा कायदेशीर मार्ग अवलंबत मानहानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना तिवारी म्हणाले की, एका मुलाखतीदरम्यान प्रफुल्ल गुडधे यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न केला. कोणतेही ठोस पुरावे नसताना आर्थिक गैरव्यवहाराचा आभास निर्माण करून आपली बदनामी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी तिवारी यांनी गुडधे यांच्या पूर्वीच्या काही सार्वजनिक विधानांचाही उल्लेख केला. "मी अर्बन नक्षल असल्याने पोलीस आयुक्त माझा एन्काऊंटर करतील," या वक्तव्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत अशा प्रकारची विधाने सार्वजनिक जीवनातील जबाबदारीला साजेशी नसल्याचे म्हटले.

आपण चार वेळा नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच महापौर म्हणून काम केले असून आपल्या सार्वजनिक कारकिर्दीत कोणताही डाग लागलेला नाही, असा दावा तिवारी यांनी केला. तसेच सध्या आपण झिंगाबाई टाकळी येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय मतभेद आणि वैचारिक टीका स्वीकारार्ह असली तरी वैयक्तिक आरोप व चारित्र्यहनन सहन केले जाणार नाही. त्यामुळे प्रफुल्ल गुडधे यांनी ४८ तासांत सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा पुनरुच्चार तिवारी यांनी केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat