Dailyhunt
सोन्याच्या दरात उसळी; ग्राहकांच्या खिशावर वाढता ताण

सोन्याच्या दरात उसळी; ग्राहकांच्या खिशावर वाढता ताण

राफा बाजारात सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा वेग घेतला असून, खरेदीदारांसाठी सोने अधिक महाग झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असताना आज, मंगळवार ७ एप्रिल २०२६ रोजी दरांमध्ये आणखी बदल नोंदवला गेला.

या वाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या बजेटवर होत असल्याचे चित्र आहे.

आजच्या घडीला देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्यासाठी सुमारे १,४९,९१० रुपये मोजावे लागत आहेत, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३७,४१८ रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या किमतीतही चढ-उतार दिसून येत असून, १ किलो चांदीसाठी २,३३,९४० रुपये तर १० ग्रॅम चांदीसाठी २,३३९ रुपये दर नोंदवला गेला आहे.

मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसारख्या प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर साधारण १,४९,६१० रुपयांच्या आसपास आहे. कर, जीएसटी आणि मेकिंग चार्जेसमुळे प्रत्यक्ष दागिन्यांच्या किमतीत मात्र फरक पडतो.

दरम्यान, सोने खरेदी करताना त्याची शुद्धता समजून घेणे महत्त्वाचे ठरते. २४ कॅरेट सोने अत्यंत शुद्ध असले तरी दागिन्यांसाठी ते कमी वापरले जाते, तर २२ कॅरेट सोन्यात इतर धातूंचे मिश्रण असल्याने त्यापासून दागिने तयार केले जातात. त्यामुळे बाजारात प्रामुख्याने २२ कॅरेट सोन्याचीच विक्री होत असल्याचे दिसते.

दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सध्या ग्राहक खरेदीबाबत सावध भूमिका घेत असल्याचेही सराफा बाजारात दिसून येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat