Dailyhunt
सुनेत्रा पवारांसाठी धोक्याची घंटा? १५-२० आमदार शरद पवारांच्या संपर्कात

सुनेत्रा पवारांसाठी धोक्याची घंटा? १५-२० आमदार शरद पवारांच्या संपर्कात

- गुप्त बैठकींमुळे राजकारण तापलं

Image Source:(Internet)

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार (Pawar) गटात अस्वस्थता वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.

पक्षाच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेला अजित पवार गटातील काही वरिष्ठ नेत्यांकडून विरोध होत असतानाच, अनेक आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटातील तब्बल १५ ते २० आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे दिसत आहे. अजित पवार गटातील अनेक आमदारांमध्ये नाराजी वाढत असून, पक्षाच्या भवितव्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काही आमदार शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकत्र येण्याचा पर्याय तपासत असल्याची चर्चा रंगत आहे.

मंत्र्यांची गुप्त भेट चर्चेत

दरम्यान, अजित पवार गटातील एका विद्यमान मंत्र्याने गुप्तपणे शरद पवार यांची भेट घेतल्याची माहितीही समोर येत आहे. या बैठकीत पक्षाच्या संभाव्य एकीकरणासह पुढील राजकीय दिशा यावर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

मतदारसंघात नाराजी वाढण्याची भीती-

पक्षातील सततच्या संघर्षामुळे अनेक आमदार चिंतेत आहेत. मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे काही आमदार पर्यायी राजकीय समीकरणांचा विचार करत असल्याचेही समजते.

सध्याच्या घडीला दोन्ही गटांमध्ये सलोखा होण्याची शक्यता कमी भासते. मात्र, अजित पवार गटातील वाढती अस्वस्थता आणि शरद पवारांकडे वाढणारी ओढ पाहता, येत्या काळात राज्याच्या रा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat