Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विदर्भात जुलै महिन्यात पावसाची दमदार बरसात; सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक वर्षाव

विदर्भात जुलै महिन्यात पावसाची दमदार बरसात; सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक वर्षाव

गोंदियात सर्वाधिक ५६ टक्के अधिक पाऊस, अमरावती मात्र सरासरीपेक्षा मागेImage Source:(Internet)
नागपूर : जुलै २०२६ मध्ये मान्सूनने विदर्भात दमदार हजेरी लावत बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात विदर्भात ३७४.१ मिमी पावसाची नोंद झाली असून, ती सरासरी ३०९.३ मिमीच्या तुलनेत २१ टक्के अधिक आहे.

यंदा अमरावती वगळता विदर्भातील उर्वरित ११ जिल्यांत सरासरीइतका किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाला. गोंदिया जिल्यात सर्वाधिक ६६८.३ मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा ५६ टक्के अधिक आहे. त्यापाठोपाठ बुलढाणा आणि यवतमाळ जिल्यांत प्रत्येकी ५१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

याशिवाय भंडारा येथे ४८२.६ मिमी (३३ टक्के अधिक), वर्धा येथे ३३०.५ मिमी (२१ टक्के अधिक), गडचिरोली येथे ५१९.८ मिमी (१९ टक्के अधिक), वाशीम येथे १४ टक्के, नागपूर येथे ६ टक्के, अकोला येथे ५ टक्के आणि चंद्रपूर येथे २ टक्के अधिक पाऊस झाला.

मात्र, अमरावती जिल्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. जिल्यात सरासरी २६८ मिमीच्या तुलनेत २४६.६ मिमी पाऊस झाला असून, तो ८ टक्के कमी आहे.

जुलै महिन्यात झालेल्या या समाधानकारक पावसामुळे विदर्भातील प्रमुख धरणे आणि जलाशयांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची स्थितीही सुधारण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास कृषी क्षेत्राला आणखी लाभ होण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat