Thursday, 29 Oct, 10.17 pm अभ्यासमंत्र

होम
रोहितला दुखापत मग तो ; विरेंद्र सेहवाग म्हणतो..

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची बीसीसीआयच्या निवड समितीने घोषणा केली. टी-२०, वन-डे आणि कसोटी अशा तिन्ही संघामध्ये रोहित शर्माला जागा मिळालेली नाही. आयपीएलमध्ये पंजाबविरुद्ध सामन्यात रोहितला दुखापत झाली होती. या दुखापतीचं कारण देत निवड समितीने रोहितची संघात निवड केलेली नाही.
त्यातच मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा फलंदाजीचा सराव करत असताना व्हिडीओ सोशल मीडिया हँडवर पोस्ट केल्यामुळे रोहितला नेमकी कसली दुखापत झाली आहे याबद्दल बीसीसीआयने माहिती देणं आवश्यक असल्याची मागणी सुनिल गावसकर यांनी केली. रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकत नसल्यामुळे कायरन पोलार्ड मुंबईचं नेतृत्व करतोय. तरीही रोहित संघासोबत स्टेडीयममध्ये हजर असतो. विरेंद्र सेहवागने यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. "रोहित शर्माला झालेल्या दुखापतीबद्दल माझ्याही मनात शंका आहे.

प्रसारमाध्यमांनी हे प्रश्न विचारायला हवेत. पहिल्यांदा सांगण्यात आलं की रोहित दुखापतग्रस्त आहे. जर असं असेल तर तो मैदानात काय करतोय? मुंबईच्या दोन्ही सामन्यांना तो हजर होता, त्याला दुखापत झाली असेल तर त्याने आराम करुन लवकरात लवकर बरं होणं गरजेचं आहे. त्यामुळे रोहितला दुखापत झाली असं वाटत नाही." अस मत सेवागने एका मुलाखतीमध्ये मांडल आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AbhyasMantra
Top