Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
... म्हणून जरांगे पाटलांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी गेलो नाही; उदय सामंतांनी सांगितलं विखे पाटलाचं राज'कारण

... म्हणून जरांगे पाटलांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी गेलो नाही; उदय सामंतांनी सांगितलं विखे पाटलाचं राज'कारण

ABP माझा 1 week ago

Uday Samant : मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार सकारात्मक काम करेल असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलन करायला लागू नये हीच आमची भूमिका असेल असे सामंत म्हणाले.

मनोज जरंगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला प्रतिसाद देत आंदोलन मागं घेतलं, त्याबद्दल त्यांचे सामांतांनी आभार मानले. एकनाथ शिंदे यांच्यासह मी स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात होतो, तीन ते चार वेळा प्रसाद लाड यांच्याशी चर्चा केली होती. शिवसेनेकडून मी यावं लागेल का? यासाठी विचारलं होतं असे सामंत म्हणाले. विखे पाटील यांनी सांगितलं की आम्ही सरकार म्हणूनच जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधतोय, त्यामुळं रत्नागिरीहून एवढ्या लांब येण्याची गरज नाही, या भूमिकेमुळे आम्ही कोणी जाऊ शकलो नाही असे उदय सामंत म्हणाले.

भाजप नेते प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी दोनदा चर्चा केली होती. एकनाथ शिंदेंनी त्यांना आवाहन केलेल की अशा रणरणत्या उन्हामध्ये उपोषण करू नये, अशी माहिती मंत्री उद सामंतयांनी दिली. विद्यमान मुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक निर्णय घेतील अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला न्याय देण्याची महायुती सरकारची भूमिका असल्याचे सामंत म्हणाले. हितचिंतकांना प्रश्न पडतो की उदय सामंत का गेले नाहीत, पण उदय सामंत यांनी अनेकदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. काल देखील आमच बोलणं झाल्याचे सामंत म्हणाले.

विखे पाटील यांनी दिलेलं आश्वासन मनोज जरांगे पाटील यांना मान्य आहे, त्यांनी पाच जुलै पर्यंतची वेळ दिली आहे, सरकार सकारात्मक काम करेल असे सामंत म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलन करायला लागू नये हीच आमची भूमिका असेल असे सामंत म्हणाले.

ओबीसी समाजाच आरक्षण काहीही कमी होणार नाही

लक्ष्मण हाके हे त्यांना जे वाटतं त्याबाबत बोलत आहेत, ओबीसी समाजाच आरक्षण काहीही कमी होणार नाही, हीच भूमिका महायुती सरकारची आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विचार करायला हवा, टोकाचा संघर्ष जाती-जातीमध्ये असता कामा नये. भविष्यातील पिढी एकमेकाकडे वैरी म्हणून बघू नये ही भूमिका जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके या दोन्ही नेत्यांची असावी. लक्ष्मण हाके यांची देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक करून देऊ असे सामंत म्हणाले. महाराष्ट्रातील कोणत्याही जाती धर्मावर अन्याय होऊ नये हीच आमची भूमिका असल्याचे सामंत म्हणाले. कोल्हापूरच्या निवडणुकांचा मला अभ्यास करावा लागणार आहे, कारण आमचं ठरलंय आणि आपलं ठरलंय यातील फरक मला समजलेला नाही. यातील फरक जेव्हा दहा-पंधरा वेळा येऊन कळेल तेव्हाच मला यावर बोलता येईल असे सामंत म्हणाले.

Author : विजय केसरकर, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha