Dailyhunt
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?

... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?

ABP माझा 2 weeks ago

मुंबई: राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी कायम असल्याचं आज पुन्हा एकदा अधोरेखित झालं. कारण, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने ऐनवेळी माघार घेतली असून मविआचे उमेदवार म्हणून शिवसेना युबीटी पक्षाचे अंबादास दानवे यांना मान्यता दिली.

एकीकडे महाविकास आघाडी कायम असताना दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी राष्ट्रवादीतील विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम लागल्याचं म्हटलं. मात्र, यापुढे पवार विरुद्ध पवार (NCP) असा राजकीय संघर्षा माझ्याकडून तरी पाहायला मिळणार नाही. लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार होणार नाही, असे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले. त्यावर, आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलंय. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंच्या भूमिकेशी विसंगती दर्शवली आहे.

सत्ताधारी पक्षाचं आणि विरोधकांचं पुढील 10 वर्षातील महाराष्ट्र व्हिजन काय? या अनुषंगाने आज मंत्री आदिती तटकरे, मंत्री योगेश कदम आणि आमदार रोहित पवार यांनी आज एबीपी माझाच्या माझा व्हिजन कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, आम्ही विरोधक आहोत, आज उनका टाईम है, हमारा दौर आएगा. पुढील 9 वर्षात संधी मिळाली तर महाराष्ट्रातले जे भोंदूबाबा आहेत त्यांना पकडून जेलमध्ये टाकलं पाहिजे.आत्ताचं जे राजकारण चाललंय ते अतिशय खालच्या लेव्हलला गेलेलं आहे. आपण 1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची म्हणतो पण त्या लेव्हलला घेऊन जाण्यासाठी आपल्या राज्याची ग्रोथ 15 टक्के पाहिजे, जी सध्या 6 ते 7 टक्के आहे. विरोधक म्हणून आम्ही शिक्षण, आरोग्य, गुन्हेगारी यांसारख्या विषयांवर बोललं पाहिजे. आधीच्यांनी काय केलं, नेहरुंनी काय केलं, तुझ्या आजोबांनी हे केलं होतं वगैरे बोलण्यापेक्षा आता आपण काय केलं पाहिजे याविषयी बोललं पाहिजे, असे म्हणत आमदार रोहित पवारांनी आजच्या परिस्थितीवर भाष्य करण्याची अपेक्षा व्यक्त केलीय.

तोपर्यंत पवार विरुद्ध पवार होणार नाही

भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही, किमान माझ्याकडून तरी ते होणार नाही, अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतली. त्यावर, आमदार रोहित पवार यांनी भूमिका मांडली. सुप्रियाताईंनी जी भूमिका घेतली भावनिक होऊन घेतली, कदाचित राजकीय देखील असू शकेल. मात्र, पवार विरुद्ध पवार का झालं, भाजपविरुद्ध किंवा महायुतीविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी ही भूमिका घेण्यात आली आहे. राजकारणात आज एक आणि उद्या दुसरं असं होतं. त्यामुळे, सध्या जे महायुतीत आहेत, ते महायुतीत राहणार नाहीत तेव्हाच पवार विरुद्ध पवार होणार नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये आपला विरोध कायम असल्याचे सांगितले. तसेच, अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंच्या भूमिकेशी त्यांनी असहमतीच दर्शवल्याचे दिसून येते.

महिल आयोग राजकीय ठिकाण

आपण कायदा बनवतो, पण तो योग्य पद्धतीने लागू होतो की नाही तेही पाहिले पाहिजे. अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यासंदर्भात पोलिसांनाही माहिती नाही. एखादा कायदा लागू होत असताना पोलिसांनाही कायद्यातील कलमांचे ज्ञान दिलं पाहिजे. महिला आयोग जे राजकीय ठिकाण झालंय ना, तिथे माजी आयएएस किंवा माजी आयपीएस अधिकारी बसवा, ज्याचं राजकारणाशी काहीही देणेघेणं नाही अशी महिला तिथं बसवा. आज महिलांना विश्वासच बसत नाही की, महिला आयोगात गेल्यावर आपल्याला खरंच मदत भेटेल, की दाबलं जाईल.

काळ्या जादूमागील हेतू तपासणं गरजेचा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीसंदर्भात बोलताना चौकशी आणि कारवाई होत असेल तर चांगलं आहे. जे घडलंय त्याचा खोलात जाऊन तपास केला पाहिजे. आम्हाला चौकशी नको तपास हवाय. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत ते करत असतील तर चांगलंच आहे, असे रोहित पवार यांनी म्हटलं. भोंदूबाबा, ब्लॅक मॅजिक याच्यावर माझा, आमच्या परिवाराचा अजिबात विश्वास नाही. पण, कुठलीही गोष्ट घडत असताना, एखादी काळी पूजा केली जात असताना त्या मागचा हेतू काय? एखाद्या व्यक्तीला इजा पोहोचवणे, एखाद्या व्यक्तीची जागा घेणं किंवा दुसरं काहीतरी. जेव्हा आपण गुन्हेगारी तपास करत असतो, तेव्हा हेतू काय हे तपासणंही महत्त्वाचं आहे, असे रोहित पवार यांनी म्हटलं.

विलिनीकरण ही अजित पवारांची इच्छा होती

गेल्या 4 महिन्यात पाहा की अजितदादा महायुतीच्या बाजूने होते की विरूद्ध बोलत होते. दादा आज नाहीत पण विलिनीकरण हीच त्यांची इच्छा होती, असे रोहित पवार यांनी म्हटलं. तसेच, अजित पवार नसतानाचे तीन महिने निश्चितच कठीण गेले. ज्या भूमीत ते मोठे झाले, त्याच भूमीत एक एफआयआर नोंद होऊ नये? असा सवाल करत त्यांनी खंतही व्यक्त केली.

हेही वाचा

एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Author : महेश गलांडे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha