Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
100-200 सोडून द्या, निवासी भागात तब्बल 300 किमीच्या स्पीडने पोर्शे कार चालवली, दुचाकीवाल्याना बाजूनं काय गेलं हेच कळंना, ड्रायव्हरच्या मुसक्या आवळल्या, कार जप्त; तीन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल

100-200 सोडून द्या, निवासी भागात तब्बल 300 किमीच्या स्पीडने पोर्शे कार चालवली, दुचाकीवाल्याना बाजूनं काय गेलं हेच कळंना, ड्रायव्हरच्या मुसक्या आवळल्या, कार जप्त; तीन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल

ABP माझा 1 week ago

Ahmedabad Porsche Car Video: अहमदाबादच्या निवासी भागात ताशी तब्बल 300 किमी वेगाने पोर्श कार चालवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. चालकाची ओळख 24 वर्षीय मोहम्मद अक्रान तिरमिझी अशी पटली आहे.

तिरमिझी व्यवसायाने व्यावसायिक पायलट आहे. पोलिसांनी सांगितले की, ही कार तिरमिझीचे वडील मोहम्मद इलियास तिरमिझी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. कार जप्तही करण्यात आली आहे.

23 ऑगस्ट रोजी व्हिडिओ व्हायरल झाला

नवरंगपुरा पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 22 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे दीड वाजता घडली. दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये एचसीजी हॉस्पिटल आणि लॉ गार्डन दरम्यान एक चंदेरी रंगाची पोर्श कार धोकादायक वेगाने जाताना दिसत आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम 281 अंतर्गत गुन्हा दाखल

अक्रानविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 281 आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कलम 281 मध्ये सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे किंवा बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास शिक्षेची तरतूद आहे.

गर्लफ्रेंडला स्विफ्ट कारचा 3 हजार 400 वेळा 'किस वर किस' घ्यायला लावला

दुसरीकडे, ग्वाल्हेरमध्ये, सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या प्रयत्नात केलेला एक अनोखा स्टंट कार मालकाला महागात पडला. शहरातील रहिवासी आदित्य सिकरवारच्या गाडीवर त्याच्या गर्लफ्रेंडने सुमारे 3400 लिपस्टिकने किस वर किस घेतले होते. यासाठी चार तास उठाठेव सुरु होती. संपूर्ण स्विफ्ट कारवर गर्लफ्रेंडच्या ओठांनी लिपस्टिकचे हे ठसे उमटवण्यात आले, ज्यामुळे कार एखाद्या चालत्या कॅनव्हाससारखी दिसत होती.

हे मोटार वाहन नियमांचे उल्लंघन

कारचे व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल होताच, ग्वाल्हेर वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. पोलीस अधिकाऱ्यांनी गाडीच्या नोंदणी क्रमांकाचा वापर करून थाटीपूर परिसरात शोध घेतला. वाहतूक पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले की, वाहनाचे मूळ स्वरूप आणि रंग अशा प्रकारे बदलणे हे मोटार वाहन नियमांचे उल्लंघन आहे आणि यामुळे इतर चालकांचे लक्ष विचलित होऊन सुरक्षेला धोका निर्माण होतो. परिणामी, मालकाला 5 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि गाडीवरील सर्व ठसे तत्काळ धुवून टाकण्याचे निर्देश देण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha