IPL 2026 Royal Challengers Bengaluru and Gujarat Titans : दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सनेराजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. गुजरातच्या एकतर्फी विजयात कर्णधार शुभमन गिलच्या शतकाची भूमिका महत्त्वाची होती.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 6 गडी गमावून 214 धावा केल्या. पाठलाग करताना, गुजरातने 18.4 षटकांत 3 गडी गमावून 219 धावा करत विजय मिळवला. गिलने संघासाठी सर्वोच्च खेळी केली, त्याने 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 53 चेंडूंमध्ये 104 धावा केल्या. दरम्यान, आता गुजरात टायटन्सचा अंतिम सामना 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध खेळवला जाणार आहे.
31 मे (रविवार) रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध अंतिम सामना होणार
गिलसोबत सलामीला आलेल्या साई सुदर्शननेही शानदार खेळी करत अर्धशतक झळकावले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 167 धावांची (77 चेंडूंमध्ये) भागीदारी करून संघाचा विजय जवळपास निश्चित केला होता. सुदर्शनने 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 32 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या. मागील सामन्याप्रमाणेच, या सामन्यातही तो हिट विकेट बाद झाला. गुजरात दुसरा अंतिम स्पर्धक ठरला. संघ 31 मे (रविवार) रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध अंतिम सामना खेळेल.
राजस्थानची सुरुवात अत्यंत खराब झाली. फॉर्मात असलेला सलामीवीर यशस्वी जैस्वाल खातेही न उघडता मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यापाठोपाठ ध्रुव जुरेलही अवघ्या 7 धावा करून कागिसो रबाडाचा बळी ठरला. अवघ्या 9 धावांवर 2 गडी गमावल्यामुळे राजस्थानचा संघ अडचणीत सापडला होता. परंतु, या कठीण परिस्थितीत वैभव सूर्यवंशीने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. वैभवने अवघ्या 47 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 96 धावांची तुफानी खेळी केली. शतकाच्या अगदी जवळ असताना कागिसो रबाडाने त्याला बाद केले.
वैभव सूर्यवंशीची खेळी व्यर्थ
राजस्थानचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 15 वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीने 8 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 47 चेंडूंमध्ये 96 धावा करत एक शानदार खेळी केली. रवींद्र जडेजानेही 45 धावा केल्या. संघातील उर्वरित फलंदाजांना फारशी कामगिरी करता आली नाही.
सूर्यवंशी आणि जडेजा यांच्या व्यतिरिक्त, यशस्वी जैस्वालने 1 धाव, ध्रुव जुरेलने 7 धावा, कर्णधार रियान परागने 11 धावा, दसुन शनाकाने 3 धावा, जोफ्रा आर्चरने 7 धावा केल्या आणि डेनोव्हन फरेराने 11 चेंडूंमध्ये 38 धावा केल्या. फरेराच्या खेळीत 2 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
Author : एबीपी माझा वेब टीम

