Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान

आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू, शेती पिकांचंगी मोठं नुकसान

ABP माझा 4 months ago

Pune Rain News : राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील चांडोली येथे वादळी वाऱ्याच्या पावसाने घराचे छप्पर अंगावर कोसळून 69 वर्षाच्या जेष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

हरिभाऊ थोरात असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

वादळी वाऱ्याच्या अनेक घरांचे छप्पर उडाले

वादळी वाऱ्याच्या अनेक घरांचे छप्पर उडाले तर मुक्या प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. शेतीमाल ही जमीनदोस्त झाला आहे. पॉलिहाऊसही जमिनदोस्त होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याच्या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.

शेती पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आज दुपारनंतर झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने मोठे नुकसान घडवून आणले आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः चांडोली, खडकी आणि परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके आडवी झाली असून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेली, तर गोठे आणि विद्युत पोलही कोसळल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव परिसराला वादळी वाऱ्याच्या मान्सूनपूर्व पावसाने झोडपल्याने शेती मालासह घरांचे प्रचंड नुकसान झालं आहे. उभा शेतीमाल आडवा झाला आहे. विद्युतवाहक पोल जमिनदोस्त झाले आहेत. अनेक घरांचे छप्पर उडून गेल्याने शेतकऱ्यांचा संसार उघड्यावरती आला आहे. बँकेचे कर्ज काढून उभं केलेली घर, घरात रहायला जाण्यापूर्वीच वादळी वाऱ्याच्या पावसाने उडून गेल्याने आता राहायचं कुठं याची चिंता शेतकऱ्यांपुढे उभी राहिला आहे.

सोलापूर शहरात अचानक पावसाला सुरुवात

सोलापूर शहरात अचानक पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून प्रचंड ऊन असताना संध्याकाळी अचानक वातावरण बदल झाला आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह शहरातील विविध भागात पावसाची हजेरी. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीमुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Author : नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha