Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Aamir Khan And Gauri Wedding Home: सजलं हो सजलं! आमिर खानच्या घरात लग्नाची लगबग सुरू; पाहुण्यांसाठी खास तयारी, Inside PHOTOS पाहा

Aamir Khan And Gauri Wedding Home: सजलं हो सजलं! आमिर खानच्या घरात लग्नाची लगबग सुरू; पाहुण्यांसाठी खास तयारी, Inside PHOTOS पाहा

ABP माझा 2 weeks ago

 बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. 5 जुलै रोजी अभिनेता आपली लेडी लव्ह गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
 मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही रजिस्टर्ड पद्धतीने लग्न करणार आहेत.

दोघांची मैत्री 25 वर्ष जुनी असल्याची माहिती आहे. दोन वर्षांपूर्वी दोघेही एकमेकांना भेटले. तसेच या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

या कपलच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. लग्नाआधी आमिरचे घर नवरदेवाच्या घरासारखे सजवले जात आहे. खुर्च्याही मागवण्यात आल्या आहेत.

आमिरच्या घराबाहेरील काही फोटो समोर आल्या आहेत. मुसळधार पावसातही अगदी काळजीपूर्वक सजवले जात आहे.

पाहुणे पावसात भिजू नये यासाठी मोकळ्या जागा या जाड प्लास्टिकने झाकल्या जात आहेत. लग्नसमारंभात व्यत्यय येऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

आमिर खानचे घर लग्नाचे घर वाटत असून, डेकोरेशनचं काम सध्या सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिरच्या लग्नाला साधारण 100 ते 150 पाहुणे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आपल्या लग्नात त्यानं स्वत:च्या आवडीचा मेन्यू निवडला आहे.

या लग्नात आमिरची मुलेही उपस्थित असतील, अशी माहिती आहे. दरम्यान, आमिर तिसऱ्यांदा लग्न करुन आपल्या नव्या वैवाहिक जीवनाला एका नवीन दिशा देणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha