Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Aarti Solanki Post On Balancing Ganesh Idols: 'बॅलेन्सिंग मूर्तीच्या नावाखाली गणपती बाप्पाला हवेत लटकवून ठेवणं हे योग्य आहे?'; मराठी अभिनेत्रीची पोस्ट VIRAL, उदाहरण देत म्हणाली...

Aarti Solanki Post On Balancing Ganesh Idols: 'बॅलेन्सिंग मूर्तीच्या नावाखाली गणपती बाप्पाला हवेत लटकवून ठेवणं हे योग्य आहे?'; मराठी अभिनेत्रीची पोस्ट VIRAL, उदाहरण देत म्हणाली...

ABP माझा 5 days ago

Aarti Solanki Post On Balancing Ganesh Idols: गणेशोत्सव (Ganeshotsav 2026) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच सार्वजनिक मंडळांकडून (Ganeshotsav Mandal) लाडक्या बाप्पाच्या दिमाखदार आगमन सोहळ्यांचं आयोजन केलं जातंय.

सगळीकडे बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग सुरू झालीय. गणरायाच्या वेगवेगळ्या रुपातल्या आकर्षक मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. सध्या 'बॅलेंसिंग गणेश मूर्ती' (Balancing Ganesha Idol) ट्रेंडमध्ये आहेत. यासाठी बरीच गणेशोत्सव मंडळं आग्रही असल्याचंही पाहायला मिळतंय. अशातच बाप्पााच्या मूर्तीसोबत केले जाणारे आगळे-वेगळे प्रयोग अनेकांना खटकत असल्याचं पाहायला मिळतंय. मराठमोळ्या अभिनेत्रीनं (Marathi Actress) एक सोशल मीडिया पोस्ट करुन सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

'फू बाई फू'सारख्या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली आणि आपल्या कॉमेडी अंदाजानं प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री आरती सोलंकी (Actress Aarti Solanki) नेहमीच अनेक मुद्द्यांवर व्यक्त होत असते. अशातच सध्या तिनं एक सोशल मीडिया पोस्ट करुन गणेशोत्सवात सुरू असलेल्या ट्रेंडकडे लक्ष वेधून घेतलं आहे. वाईट वाटतं बाप्पासाठी... सण आणि बाप्पा हा पारंपरिक हवा, असं म्हणत अभिनेत्री आरती सोलंकीनं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्री आरती सोलंकीचं नेमकं म्हणणं काय?

"अरे हे काय चालवलंय? गणपती बाप्पाचं रुप मुळातच सुरेख, देखणं, गोड असताना बाप्पाला वेगळं रुपात घडवण्याची गरजच काय? मंडपात देखावा हवा तो करा. खरंतर त्याचीही गरज नाही, पण मंडळाच्या स्पर्धेत वाढ झाली काय करणार? सगळ्यात वाईट गोष्ट बॅलेन्सिंगच्या नावावर अक्षरश: बाप्पाला हवेत लटकवून ठेवणं हे योग्य आहे का? वाईट वाटतं बाप्पासाठी. सण आणि बाप्पा हा पारंपरिक हवा. स्वत:च्या मुलांना फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तयार करतात तसं बिचाऱ्या बाप्पाला सजवतायत. माफ करा बाप्पा.. तुम्ही बुद्धीचे देवता आहात. आता याल तर सगळ्यांना चांगली बुद्धी द्या...", असं आरती सोलंकी म्हणाली आहे.

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम अभिनेत्री आरती सोळंकी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. तिनं तिच्या ट्रान्सफॉर्मेशननं सर्वांना थक्क केलेलं. तिचं फॅट टू फिट पर्यंतचं फिटनेस पाहून अनेकांनी तिचं भरभरुन कौतुक केलंय. अशातच आता तिनं उपस्थित केलेल्या मुद्द्यावर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Sunil Pal Lashes Out At Archana Puran Singh: 'पैशांपायी अन् प्रसिद्धीच्या मोहापायी...', समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटंट 2'मधील दिग्गज अभिनेत्रीवर संतापले सुनील पाल, थेट VIDEO शेअर करुन म्हणाले...

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha