छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पाच तारखेला दिल्लीत आंदोलन करणार असल्याीच माहिती दिली. विद्यार्थ्यांवर जे गुन्हे दाखल केले होते त्या मागण्या अजूनही मान्य झाल्या नाहीत.
त्यामुळे आम्हाला नाइलाजाने आंदोलन करावं लागतंय असं दीपकेंनी म्हटलं.. सरकार म्हणत होतं की कोर्टामुळे आम्हाला ते करता येत नाही, पण कोर्ट म्हणतं आम्ही तयार आहोत तुम्ही फक्त लिस्ट द्या मात्र सरकार लिस्ट देत नाही देत नाही, असा दावा अभिजीत दीपके यांनी केला. जंतर-मंतरवर अगोदर जे आंदोलन झालं होतं त्यापेक्षा मोठा आंदोलन होणार आहे. आदिवासी मुलं आंदोलनाला बसली आहेत, देशातील असं एकही राज्य नाही की जिथे आंदोलन सुरू नाही, असंही दीपकेंनी म्हटलं.
बॉम्बे हायकोर्टाची क्लार्क टायपिंग टेस्ट रद्द झाली आहे. परीक्षेवेळी की बोर्ड मध्ये प्रॉब्लेम होता अजून काही अडचणी होत्या.परीक्षा पुन्हा घेण्यात याव्यात अशी मागणी होती ती मागणी पूर्ण झाली आहे.यापुढे ज्या काही परीक्षा होतील ज्या सेंटरवर प्रॉब्लेम आले होते त्या सेंटरवर परीक्षा घेण्यात येऊ नये, असंही अभिजीत दीपके यांनी म्हटलं.
सोनम वांगचुक यांच्या वक्तव्यावर बोलताना अभिजीत दीपके म्हणाले, मला वाटतय तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पाहिला नाही, ते म्हणतात की मी जेवढे पाहिले आणि जेवढे राजकीय नेते पहिले त्यापेक्षा ही मुलं खूप चांगली आहेत. त्यांच्या बोलण्यामध्ये अजून तरी मला काही चुकीचं वाटलं नाही. पूर्ण व्हिडिओमध्ये तेच म्हटले आहेत हे मुलं खूप चांगले आहेत शिकलेली आहेत. तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघावा ते खूप साऱ्या गोष्ट बोलल्या आहेत. सोनम वांगचुक यांनी अविश्वास कुठे दाखवला मला तर खूप छान वाटलं, राजकारणात सध्या अपराधी बसले आहेत त्यापेक्षा ही मुलं चांगली आहेत.मी का वाटून घेऊ त्या गोष्टीचं.असं दीपके म्हणाले.
मनोज जरांगेना भेटणार
मनोज जरांगे पाटील काही चुकीचं मागत नाहीत, मराठा समाजाच्या मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार मागत आहेत असे दीपके म्हणाले. रोजगाराचा अधिकार मागत आहेत. याची गरज यासाठी पडली आहे की सरकार त्या दोन गोष्टीवर पूर्णपणे अपेक्षित आहे. मी जरांगे पाटील यांनी नक्की भेटणार आहे. ते दिल्लीपर्यंत आले होते, मी इथपर्यंत जाऊ शकतो. मनोज जरांगे सरांना भेटायला मी नक्की जाईल असेही दीपके म्हणाले.
Author : डॉ. कृष्णा केंडे

