Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2026 | शनिवार

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2026 | शनिवार

ABP माझा 1 week ago

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2026 | शनिवार

1. राज्यभर पावसाचं धुमशान, मुंबई-ठाण्यासह कोकणात जलमय परिस्थिती, कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत वाढ झाल्याने चिंता वाढली, पुढील दोन दिवस राज्यात वादळासह मुसळधार पावसाचा इशारा https://tinyurl.com/jvwwezy6 गरज असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नागरिकांना आवाहन https://tinyurl.com/48rvwyf5

2. राज्यभरात 'आभाळमाया' कायम! मुंबई उपनगरात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार, विदर्भातही पावसाचा जोर कायम https://tinyurl.com/m4694fje हवामान खात्याकडून पुढचे दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट https://tinyurl.com/ycaz444e

3. कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगेची पातळी 22 फुटांवर, राजाराम बंधाऱ्यासह 10 बंधारे पाण्याखाली, प्रशासन अलर्ट मोडवर https://tinyurl.com/ya782uhb कोल्हापुरातील संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासन सज्ज, एनडीआरएफकडून बोटीची चाचणी आणि आवश्यक प्रशिक्षण पूर्ण https://www.youtube.com/watch?v=l9NaMWjpYgY

4. मुसळधार पावसाने राज्यातील 11 धरणं तुडुंब भरली, हातनूर, गोसेखुर्द धरणांचे दरवाजे उघडले, रायगडमधील 7 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा https://tinyurl.com/2wunxkhs मुंबईकरांना दिलासा, धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ https://www.youtube.com/watch?v=tIgtDIyhQdU

5. मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार, कांदरपाडा ते आनंदनगर दरम्यान ओव्हरहेड केबल तुटल्याने यलो मेट्रो बंद पडली, रेल्वे ट्रॅकवरही पाणीच पाणी, वसई विरारमध्ये पावसाची धडकी भरवणारी दृश्यं https://tinyurl.com/2wnwua4c भांडूपमध्ये रस्ता खचून टेम्पो अन् झाड बघता बघता जमिनीच्या पोटात गायब झालं, सुदैवाने जीवितहानी नाही, वाहतूक मात्र विस्कळीत https://tinyurl.com/3xuwtuf7

6. देवेंद्र फडणवीस, तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो, भाजपच्या लोकांना सत्तेचा माज आलाय, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, तर घरात बसून पोस्ट करणाऱ्यांना उत्तर देणार नसल्याचा अमित साटम यांचा पलटवार https://tinyurl.com/ypdhtm4w मुलाच्या मृत्यूवर अमित साटम फिदीफिदी हसल्याचा आरोप, संजय राऊत संतापून म्हणाले, 'तुमच्या अंत्ययात्रेला लोक भाड्याने बोलवावी लागतील' https://tinyurl.com/4hapvxjk

7. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या ज्युपिटर रूग्णालयात दाखल, व्हायरल ताप आणि अशक्तपणामुळे उपचार, शिंदेंची प्रकृती स्थिर, आज संध्याकाळी डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती https://tinyurl.com/52hksbft

8. प्रेमविवाहानंतर बारामतीहून पुण्यात स्थायिक झाले, पतीचं ऑफिसमधील मुलीवर प्रेम जडलं, मानसिक धक्क्यामुळे विवाहितेने जीवन संपवलं, पती आणि प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/yr924329 रायगडमध्ये टेम्पो आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक, एकाचा जागीच मृत्यू https://tinyurl.com/4e4razp6

9. मुंबईत हिट अँड रनचा थरार! जोगेश्वरीत मद्यधुंद टँकरचालकाने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; जागेवरच प्राण सोडला https://tinyurl.com/c52wru5b पुण्यातील खासगी कंपनीमध्ये संतापजनक कृत्य, सहकाऱ्याने प्रायव्हेट पार्टमध्ये कॉम्प्रेसरचा पाईप घातला अन् पोटात हवा भरली, कामगाराचा मृत्यू https://tinyurl.com/4y69ajn9

10. पहिल्या विजयासाठी श्रेयस अय्यर सज्ज, भारत-इंग्लंड दुसरा टी-20 आज, वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाकडेही चाहत्यांचे लक्ष https://tinyurl.com/4xkrr5v3 टीम इंडियाकडून युवा कसोटीपटूंचा शोध सुरू, बंगळुरुमध्ये विशेष कार्यक्रम, श्रीलंका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयचं मोठं पाऊल https://tinyurl.com/jvwwezy6

एबीपी माझा स्पेशल

पावसाच्या ढगांमध्ये आढळला 'ब्लॅक कार्बन', ढगांसंदर्भात महत्वाचं संशोधन, पावसावर परिणाम होणार का? https://tinyurl.com/y7m9nvxw

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

Author : एबीपी माझा ब्युरो

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha