Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Akola Crime News: तपासणी, उपचाराच्या बहाण्यानं डॉक्टरनं तरूणीला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेलं; अश्लील वर्तन केलं अन्....; अकोल्यातल्या नामांकित डॉक्टरचं कृत्य समोर

Akola Crime News: तपासणी, उपचाराच्या बहाण्यानं डॉक्टरनं तरूणीला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेलं; अश्लील वर्तन केलं अन्....; अकोल्यातल्या नामांकित डॉक्टरचं कृत्य समोर

ABP माझा 5 days ago

कोला: अकोल्यातल्या सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. २९ ऑगस्टला उपचारासाठी गेलेल्या एका युवतीसोबत गैरवर्तन केल्याचा (Akola Crime News) आरोप एका नामांकित डॉक्टरवरती करण्यात आला आहे.

आरोप करण्यात आलेला डॉक्टर हा शहरातील नामांकित स्किन स्पेशालिस्ट आहे. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे ४६ वर्षीय डॉक्टरला अटक केली आहे. (Akola Crime News)

तपासणी आणि चेहऱ्यावरील केसांवर उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टरने युवतीला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेलं. यावेळी पीडित तरुणीसोबत त्याने अश्लील वर्तनाचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. औषध देण्याच्या बहाण्याने वैद्यकीय दुकानातही लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप आहे. युवतीने आई-वडिलांना (Akola Crime News) प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांसह पोलिसांत धाव घेतली. BNS कलम ७४ आणि ७५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकर यांनी संताप व्यक्त केला. मुरूमकर यांनी आरोपी डॉक्टरला गाठून 'शिवसेना स्टाईल' चोप दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, डॉक्टरकडून यापूर्वीही अशाच प्रकारचं गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला.(Akola Crime News)

Akola Crime News: नेमकं काय घडलं?

सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामनगरातील होमिओपॅथी त्वचारोगतज्ज्ञाच्या विरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात तरुणीचा घेतले. उपचारासाठी डॉक्टरकडे आलेल्या नागपुरातील विनयभंग केल्याच्या आरोपाने अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नागपूर येथील एक युवती दि. २९ ऑगस्ट रोजी उपचारासाठी अकोल्यात आली होती. ती संबंधित डॉक्टरच्या दवाखान्यात गेली असता, सर्व रुग्ण गेल्यानंतर निघून तिला चेंबरमध्ये बोलावण्यात आल्याचा आरोप तक्रारीत आहे. त्यानंतर तपासणी आणि उपचाराच्या नावाखाली तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याचा आरोप युवतीने केला आहे. घटनेनंतर युवतीने थेट सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी डॉक्टरच्या विरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला आणि पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले. या घटनेमुळे रामनगर परिसरासह शहरात चर्चेला उधाण आले आहे.

Akola Crime News: इतर रुग्ण बाहेर गेल्यानंतर चेंबरमध्ये बोलावले'

तक्रारीनुसार, उपचारासाठी आलेल्या युवतीची डॉक्टरकडून तपासणी करण्यात आली. मात्र, इतर रुग्ण निघून गेल्यानंतर तिला स्वतंत्रपणे चेंबरमध्ये बोलावण्यात आले. याच ठिकाणी उपचाराच्या नावाखाली तिच्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकारानंतर युवतीने धाडसाने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदविल्याने प्रकरण समोर आले. पोलिसांकडून तक्रारीतील आरोपांची पडताळणी करण्यात येत असून, घटनेशी संबंधित सर्व बाबींचा तपास सुरू आहे.

Akola Crime News: यापूर्वीही अशी प्रकारचं गैरवर्तन झाल्याची माहिती

डॉक्टरच्या विरुद्ध यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. २ मे २०२४ रोजी एका महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे.

Author : उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha