Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Akola News : अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत 8 कोटी 97 लाखांचा अपहार, पिता-पुत्र दोघे अटकेत,गुंतवणूकदारांच्या 25 कोटींच्या ठेवी अडकल्या

Akola News : अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत 8 कोटी 97 लाखांचा अपहार, पिता-पुत्र दोघे अटकेत,गुंतवणूकदारांच्या 25 कोटींच्या ठेवी अडकल्या

ABP माझा 2 weeks ago

कोला : अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत 8 कोटी 97 लाखांचा अपहार झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून पिता-पुत्र दोघांना अटक करण्यात आली आहे. या पतसंस्थेत गुंतवणूकदारांच्या 25 कोटींच्या ठेवी अडकल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळं ठेवीदारांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

पिता-पुत्र दोघांना अटक

अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी पिता-पुत्र असलेल्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. या पतसंस्थेत 8 कोटी 97 लाख रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलं आहे.

अकोल्यातील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तब्बल 8 कोटी 97 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले त्यांचे पुत्र नंदकिशोर आवारे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी अकोल्यातील डाबकी रोड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पतसंस्थेने ठेवीदारांना पैसे परत देणे बंद केले होते. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

अकोला शहरातील नोकरदार, पेन्शनर, कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांसह सुमारे अडीच हजार ठेवीदारांचे पैसे या पतसंस्थेत अडकले आहेत. संस्थेत 25 कोटी रुपयांहून अधिक ठेवी असल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, संस्थेच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपहार करून हा पैसा इतरत्र गुंतवल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला होता. अनेक तक्रारीनंतर अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पुढाकाराने कारवाई करण्यात आली.

दरम्यान, अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांची संख्या अडीच हजार इतकी आहे. या पतसंस्थेतील ठेवींची रक्कम 25 कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती आहे. या पतसंस्थेतून ठेवीदारांचे पैसे देणं एप्रिलपासून बंद करण्यात आलं. या पतसंस्थेच्या अकोल्यात दोन, तेल्हाऱ्यात एक शाखा कार्यरत आहेत.

Author : उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha