Dailyhunt
Anjangaon Statue Controversy: मोठी बातमी: राज्यभरात विनापरवाने पुतळे कोण बसवतंय? अंजनगाव खेलोबातील मास्टरमाईंड सापडला, एकूण 9 गुन्हे दाखल!

Anjangaon Statue Controversy: मोठी बातमी: राज्यभरात विनापरवाने पुतळे कोण बसवतंय? अंजनगाव खेलोबातील मास्टरमाईंड सापडला, एकूण 9 गुन्हे दाखल!

ABP माझा 1 week ago

Anjangaon Statue Controversy: राज्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीतून महापुरुषांचे पुतळे बसवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, यामुळे अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे.

सोलापूर जिल्ह्यातही अशाच प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा (Anjangaon Statue Controversy) येथे रात्रीतून पुतळा बसवण्यात आल्यानंतर दोन समाजांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणानंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील शेकडो लोकांवर तब्बल आठ विविध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये जीवघेणा हल्ला, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दंगल भडकवणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे.

बाळराजे आवारेविरोधात राज्यभरात 11 गुन्हा दाखल- (Balraje Aware Patil Anjangaon Statue Controversy)

प्राथमिक तपासात जालना जिल्ह्यातील बाळराजे आवारे (Balraje Aware Patil) याचा या प्रकरणात सहभाग समोर आला असून, त्याच्याविरोधात विना परवाना पुतळा बसवणे, जातीय तेढ निर्माण करणे, पोलीस वाहनांचे नुकसान, जीवघेणा हल्ला आणि भडकाऊ भाषण करणे अशा तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, करमाळा तालुक्यातील पुनावर येथे बसवण्यात आलेल्या पुतळा प्रकरणातही त्याचाच सहभाग असल्याचे समोर आले असून त्या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी ही बाळराजे आवारे विरोधात विविध प्रकारणात जवळपास अकरा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दरम्यान, अंजनगाव येथे जमिनीच्या मोजणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याविरोधातही शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापुरचे पालकमंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले? (Jaykumar Gore On Anjangaon Statue Controversy)

दरम्यान सोलापुरात सुरु असलेल्या पुतळा प्रकारावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. कोणी पुतळा दिला आणि कोण बसवला याचा तपास सुरू आहे. सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम किंवा महाराजांचा अवमान करण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. सोलापुरात ही नववी घटना असून अशा प्रकारे पुतळा बसवल्यावर त्यांना परवानगी दिली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आहे.

अंजनगाव खेलोबा प्रकरणानंतर सोलापुरात दाखल गुन्हे- (Anjangaon Statue Controversy)

1. माढा पोलीस स्टेशन - विना परवाना पुतळा बसवून जातीय तेढ निर्माण करणे

कलम - BNS 329(3), 223, 298, 302, 329, 330, 189, 62(2), प्राचीन संस्मारके सारंक्षण अधिनियम 11

आरोपी : बाळराजे आवारे आणि इतर

2. माढा पोलीस स्टेशन - विना परवाना रास्ता रोको आंदोलन

कलम : BNS कलम 126(2), 189(2), 191(2), 190, 221

आरोपी : एका गटातील 30-40 लोक

3. माढा पोलीस स्टेशन - विना परवाना रास्ता रोको आंदोलन

कलम : BNS कलम 126(2), 189(2), 191(2), 190, 221

आरोपी : दुसऱ्या गटातील 30-40 लोक

4. माढा पो. स्टे. - पोलीस वाहनाचे नुकसान आणि जीवघेणा हल्ला

कलम - BNS 109, 118(1), 189(2), 191(2), 191(3), 190, 324(4), 132, 62(2) सर्वजनिक मालमत्ता विद्रुपिकरण 3(1)

आरोपी : बाळराजे आवारे आणि इतर

5. माढा पो. स्टे - महसूल वाहनाचे नुकसान आणि जीवघेणा हल्ला

कलम : BNS 109, 118(1), 189(2), 191(2), 191(3), 190, 324(4) सर्वजनिक मालमत्ता विद्रुपिकरण 3(1)

आरोपी : 70 ते 80 लोक

6. माढा पोलीस स्टेशन - विना परवाना रास्ता रोको आंदोलन

कलम : BNS कलम 126(2), 189(2), 191(2), 190, 221

आरोपी : 25-30 लोक

7. माढा पो स्टे - प्रक्षोभक भाषण
कलम - BNS 192
आरोपी - बाळराजे आवारे

8. माढा पो स्टे - शासकीय कामात अडथळा
कलम - BNS 132
आरोपी - लक्ष्मण हाके आणि 60 ते 70

9. करमाळा पो. स्टे - विना परवाना पुतळा बसवणे
कलम - BNS 323, 189
आरोपी - बाळराजे आवारे आणि इतर 10

महाराष्ट्रात महापुरुषांच्या पुतळ्यावरुन राजकारण का होतंय?, VIDEO:

Anjangaon Statue Controversy: माढा तालुक्यातील अंजणगाव खेलोबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तणाव; नेमका वाद आहे तरी काय?

Author : आफताब शेख, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha