Dailyhunt
Ankita Walawalkar Allegations Against UP Courier Agent:''अशा प्रसंगांनी मन खचतं...', कोकण हार्टेड गर्ल पोलिसांत जाणार; नेमकं काय घडलंय? Video मधून सगळंच सांगितलं

Ankita Walawalkar Allegations Against UP Courier Agent:''अशा प्रसंगांनी मन खचतं...', कोकण हार्टेड गर्ल पोलिसांत जाणार; नेमकं काय घडलंय? Video मधून सगळंच सांगितलं

ABP माझा 1 month ago

Ankita Walawalkar Allegations Against UP Courier Agent: महाराष्ट्राची ' कोकण हर्टेल गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झालेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर (Kokan hearted girl) आपल्या मालवणी भाषेमुळे आणि कोकणच्या मातीतला कंटेंट बनवण्यामुळे घराघरात पोहोचली.

आताही ती अनेक टॉक शोमध्ये, मुलाखतींमध्ये जाताना दिसते. आपले मुद्दे बेधडकपणे मांडताना ती दिसते. अंकिता वालावलकरचा कोकणी उत्पादनांचा एक व्यवसाय आहे . तिचे स्वतःचे सिंधूद्योग नावाचे दुकानही आहे. या व्यवसायामुळेच सध्या ती चर्चेत आली आहे. सध्या सिंधूद्योगमधून ग्राहकांना ती हापूस आंबे पोहोचवतेय. पण आंबे पोहोचवत असताना एका UP च्या कुरियरवाल्याने आठ ते नऊ हजारांचे आंब्याचे बॉक्स चोरले. यावरून तिने व्हिडिओ करत घडला प्रकार सांगितला.

काय म्हणाली अंकिता वालावलकर ?

अंकिताने आंब्याचे बॉक्स पॅक करतानाचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं 'Sindhudyog कडून प्रेमाने आणि विश्वासाने पाठवलेले आंब्याचे बॉक्स ग्राहकांपर्यंत पोहोचण्याआधीच चोरीला गेले, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. हे फक्त आंबे नव्हते, तर आमच्या कष्टाचं आणि प्रामाणिक मेहनतीचं फळ होतं. अशा प्रसंगांनी मन खचतं, पण आमचा निर्धार अजून मजबूत होतो. आम्ही हे संकट नक्कीच पार करू. आम्ही थांबणार नाही. आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आमच्या ग्राहकांचा विश्वास. तो विश्वास जपणं ही आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पूर्ण ताकदीने निभावू.तुमचा विश्वास, तुमचं प्रेम हेच आमचं खरं बळ आहे. "

'महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातल्याच उद्योगांना त्रास देताय '

'आंब्याचे बॉक्स आम्ही वनडे डिलिव्हरी व्हावी म्हणून मुंबईतून आम्ही एका कुरिअर कंपनीला दिले.जो व्यक्ती आमच्याकडून आंबे घेऊन गेला तो बॉक्स घेऊन गायब झाला.त्याने फोन उचलणं बंद केलं . ग्राहकांना ब्लॉक केलं.जवळपास आठ ते नऊ हजाराच्या त्या गोष्टी आहेत. आठ ते नऊ हजार रुपयांचं नुकसान हे कुठल्याही स्टार्टअपसाठी मोठं असतं.एखादा माणूस खचून जाऊ शकतो, जेव्हा असं नुकसान होतं.सोडून देण्यापेक्षा मी असा विचार केला की या व्यक्तीला आपण पकडूया.त्यासाठी आम्ही पोलीस तक्रारही दाखल करतोय.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशातली ती व्यक्ती आहे. महाराष्ट्रात येऊन,इथे राहून तुम्ही महाराष्ट्रातल्याच उद्योगांना असा त्रास देणार असाल तर नक्कीच मी तरी तुम्हाला सोडणार नाही. बघूया पोलीस काय करतात. या सगळ्या गोष्टींचे अपडेट मी तुम्हाला मुद्दामून शेअर करते आहे .जेणेकरून तुम्हाला कळेल की जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा काय केलं पाहिजे आणि अशा लोकांना कसं वठणीवर आणलं पाहिजे."

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha