Bollywood actor Arshad Warsi with daughter: 'मुन्नाभाई एमबीबीएस' (Munnabhai MBBS) व्यतिरिक्त अनेक चित्रपटातून अर्शद वारसीला (Arshad Warsi) विशेष ओळख मिळाली. अलिकडेच मुंबईत एका इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते.
या इव्हेंटमध्ये बरेच कलाकार उपस्थित होते. अर्शद वारसीही या कार्यक्रमात उपस्थित होता. पण या इव्हेंटमध्ये तो एकटा उपस्थित नव्हता. त्याच्यासोबत त्याची क्यूट मुलगीही उपस्थित होती.
मुंबईत पार पडलेल्या खास इव्हेंटमध्ये अर्शद वारसी उपस्थित होता. त्याच्यासोबत त्याची लेक जेन जोई वारसीही उपस्थित होती. यावेळी सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.
अर्शदची मुलगी खूप सुंदर दिसत होती. तिच्या सौंदर्याने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. या इव्हेंटमध्ये अर्शदची लेक इतकी सुंदर दिसत होती की, तिच्यापुढे इव्हेंटमधील अभिनेत्री फिक्या वाटत होत्या.
मुंबईत पार पडलेल्या या खास इव्हेंटमध्ये अर्शदने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. या सूटमध्ये अर्शद क्लासी आणि देखणा दिसत होता. साध्या आणि स्मार्ट लूकमुळे अर्शद Attractive दिसत होता.
ब्लॅक शर्टसोबत त्यानं ब्लॅक ब्लेझर आणि पॅन्ट घातली होती. यामुळे त्याचा लूक अधिक आकर्षक दिसत होता.
यावेळी अर्शदने तपकिरी रंगाचा चष्मा घालून आपला लूक पूर्ण केला होता. तर, तिच्या लेकीनं काळ्या - पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. ब्लॅक अँड व्हाईट ऑफ शोल्डर लूकमध्ये ती सुरेख दिसत होती.
या ड्रेसवर तिनं हिल्स घातली होती. तर, तिच्या हातात लहान पर्स देखील होती. तिनं ओपन हेअर्स ठेवून आपला लूक कम्प्लीट केला होता.
मिनिमल मेकअप लूकमध्ये अर्शदची लेक खूप सुंदर दिसत होती. या इव्हेंटसाठी खास अर्शद आणि त्याची लेक एकत्र रेड कार्पेटवरुन आले होते. बाप - लेकीची ही केमिस्ट्री नेटकऱ्यांना प्रचंड आवडली. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

